Advertisement

मध्य रेल्वेवर २४ आणि २६ जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लाॅक

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून २४ जानेवारी आणि २६ जानेवारीला मध्यरात्री विशेष ब्लाॅक घेण्यात येणार आहे. २४ जानेवारीला मांटुगा ते भायखळा अप धीम्या मार्गावर मध्यरात्री १२.४० वाजल्यापासून ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत असा हा विशेष ब्लाॅक असणार आहे.

मध्य रेल्वेवर २४ आणि २६ जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लाॅक
SHARES

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून २४ जानेवारी आणि २६ जानेवारीला मध्यरात्री विशेष ब्लाॅक घेण्यात येणार आहे. २४ जानेवारीला मांटुगा ते भायखळा अप धीम्या मार्गावर मध्यरात्री १२.४० वाजल्यापासून ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत असा हा विशेष ब्लाॅक असणार आहे. तर २६ जानेवारीला सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर रात्री ११.१५ वाजल्यापासून ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत विशेष ब्लाॅक असणार आहे. त्याचेळी याच दिवशी मध्य रेल्वेच्या इतर मार्गावरही मध्यरात्री विशेष ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. कारण या दरम्यान लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.


फलाटाच्या कामासाठी ब्लाॅक

परळ टर्मिनसच्या फलाटाच्या कामासह अन्य तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वेकडून २४ आणि २६ जानेवारीला विशेष ब्लाॅक घेण्यात येणार आहे. २४ जानेवारीला मांटुगा ते भायखळादरम्यान अप धीम्या मार्गावर मध्यरात्री १२.४० ते पहाटे ४.४० वाजेदरम्यान विशेष ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तर परळ, शीव, माटुंगा रेल्वे स्थानकातील जलद फ्लॅटफार्मवर धीम्या लोकल थांबतील. पण त्याचवेळी चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकात मात्र अप धीम्या लोकल थांबणार नाहीत. 

 

काही लोकल फेऱ्या रद्द

२४ जानेवारीसह २६ जानेवारीला सीएसटीएमच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर रात्री ११.१५ ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत विशेष ब्लाॅक असणार आहे. तर याच दिवशी भायखळा ते कल्याणदरम्यान कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावर मध्यरात्री मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत आणि दादर ते भायखळादरम्यान सीएसएमटी धीम्या मार्गावर मध्यरात्री १२.५५ ते पहाटे ५.१० वाजेपर्यंत विशेष ब्लाॅक असणार आहे. भायखळा ते माटुंगा कल्याण दिशेकडील डाऊन धीम्या मार्गावर मध्यरात्री १२.५० ते ५.१० वाजेपर्यंत ब्लाॅक असणार आहे. या विशेष ब्लाॅकदरम्यान माटुंगा ते भायखळ्यादरम्यान अप धीम्या मार्गावरील लोक जलद मार्गावर चालवल्या  जाणार आहेत. 


एक्सप्रेस उशीरानं

या विशेष ब्लाॅकच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं लोकलच्या काही फेऱ्या रद्द केल्या असून त्याचा परिणाम एक्सप्रेस गाड्यांवरही होणार आहे. २६ जानेवारीला रात्री ९.३६ मिनिटांनी सुटणारी सीएसएमटी-कुर्ला लोकल रद्द करण्यात आली आहे. तर २७ जानेवारीला मध्यरात्री १२.२८ मिनिटांनी आणि मध्यरात्री १२.३१ मिनिटांनी सुटणार्या सीएसएमटी ते ठाणे या दोन्ही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. २७ जानेवारी रोजी पहाटे ४.५१ वाजता सुटणारी कुर्ला ते टिटवाळा लोकल, सकाळी ४.२० मिनिटांनी सुटणारी ठाणे लोकल आणि सकाळी ४.०१ मिनिटांनी सुटणारी टिटावाळा लोकलही रद्द करण्यात आली आहे. तर या विशेष ब्लाॅकमुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेस उशीरानं धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.



हेही वाचा -

बेरोजगारांसाठी खुशखबर! रेल्वेत ४ लाख पदांची मेगाभरती

लोअर परेल ते चर्चगेट मार्गावर ११ तासांसाठी मेगाब्लॉक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा