Advertisement

लोअर परेल ते चर्चगेट मार्गावर ११ तासांसाठी मेगाब्लॉक

लोअर परेल ते चर्चगेट मार्गावरील रेल्वे सेवा तब्बल ११ तासांसाठी बंद करण्यात येऊ शकते. यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

लोअर परेल ते चर्चगेट मार्गावर ११ तासांसाठी मेगाब्लॉक
SHARES

लोअर परेलचा डेलिस्ले ब्रिज पाडण्यासाठी २ आणि ३ फेब्रुवारीला रेल्वे तर्फे ११ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येण्याची शक्यता आहे. या दरम्यान लोअर परेल ते चर्चगेट मार्गावरील रेल्वे सेवा तब्बल ११ तासांसाठी बंद करण्यात येऊ शकते. यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

प्रवाशांना मध्य रेल्वेचा पर्याय

लोअर परेल ते चर्चगेट या मार्गावरील रेल्वे सेवा मध्यरात्री ११ तासांसाठी बंद करण्यात येऊ शकते. ११ तासात डेलिस्ले हा ब्रिज पाडण्याचं काम पूर्ण करायचं असल्यानं २ फेब्रुवारीला रात्री १० वाजता मेगाब्लॉक सुरू होऊ शकतो. रात्री १० ते ३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजेपर्यंत पूल पाडण्याचं काम सुरू राहील. नेमका शनिवार आणि रविवार आल्यानं प्रवाशांची गर्दी कमीच असेल. तरीही या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना मध्य रेल्वेचा पर्याय उपलब्ध आहे. लोअर परेलच्या पुढे जाण्यासाठी दादरवरून मध्ये रेल्वेनं प्रवास करता येऊ शकतो.

... म्हणून पुलावर हातोडा

लोअर परेलचा डेलिस्ले पुल ब्रिटिशांनी १९२१ साली बांधला होता. हा पुल ६२.७२ मीटर लांब आणि २३.२० मीटर रूंद आहे. पण पालिका, रेल्वे आणि आयआयटीनं केलेल्या सर्वेक्षणात पुल धोकादायक असल्याचं समोर आलं होतं.  त्यामुळे पुल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.  


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा