Advertisement

चहलची दमदार कामगिरी, आॅस्ट्रेलियाच्या भूमीत विकेटसचा सिक्सर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेलबर्नवर सुरू असलेला तिसरा एकदिवसीय सामन्यात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल दमदार कामगिरी केली आहे. युजवेंद्र चहल याने या सामन्यात अवघ्या ४२ धावा देत ६ विकेटसं घेतल्या आहेत.

चहलची दमदार कामगिरी, आॅस्ट्रेलियाच्या भूमीत विकेटसचा सिक्सर
SHARES

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेलबर्नवर सुरू असलेला तिसरा एकदिवसीय सामन्यात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल दमदार कामगिरी केली आहे. युजवेंद्र चहल याने या सामन्यात अवघ्या ४२ धावा देत ६ विकेटसं घेतल्या आहेत. चहलच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे ५० षटकांत ऑस्ट्रेलियाला २३० धावापर्यंतच मजल मारता आला आणि भारताला सामनाही खिशात टाकता आली असून मॅन आॅफ द मॅचचा किताबही पटकवता आला आहे. दरम्यान एकाच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ६ विकेट्स घेणारा चहल हा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याचप्रमाणं चहलनं भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या कामगिरीशी बरोबरी सादली आहे.


संधीचं केलं सोनं

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया याच्यांत झालेल्या एकदिवसीय मालिकेतील चहलचा हा पहिलाच सामना होता. या आधीच्या दोन्ही सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. मात्र, 'मिळालेल्या संधीचं सोन करणं' हे आजच्या सामन्यात चहलनं करून दाखवलं आहे. युजवेंद्र चहलने पहिल्याच षटकात दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा भरवशाचा फलंदाज शॉन मार्श चहलच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला तर, उस्मान ख्वाजा याचा स्वत:च्या गोलंदाजीवर झेल टिपून त्याला माघारी धाडले. त्यानंतर, मधल्या फळीतील फलंदाज स्टॉइनिस (१०), रिचर्डसन (१६), हेंड्सकॉम्ब (५८) आणि जम्पा (८) यांना माघारी धाडलं. तसंच, या सामन्यात मोहम्मद शामी आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.


अजित अगरकरशी बरोबरी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेचील निर्णायक सामन्यात युजवेंद्र चहलने भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. २००४ साली मेलबर्नच्या मैदानावर अजित आगरकरनं ४२ धावांमध्ये ६ गडी घेतले होते. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी चहलनं ही कामगिरी केली आहे. तसंच चहलनं वन-डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या लेगस्पिनर्सच्या यादीतही स्थान पटकावलं आहे.



हेही वाचा -

शिखर-रोहितचा ४००० धावांचा विक्रमी चौकार

ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने दिला विजयाचा तीळगूळ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा