Advertisement

शिवसेना मोठा भाऊ आहे आणि राहणार- संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांनी बैठक पार पडणार म्हणताच सर्वांच लक्ष लागलं होतं ते युतीकडे.

शिवसेना मोठा भाऊ आहे आणि राहणार- संजय राऊत
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांनी बैठक पार पडणार म्हणताच सर्वांच लक्ष लागलं होतं ते युतीकडे. पण बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाजपाकडून जागावाटप वा युतीसंदर्भात कोणताही प्रस्ताव आला नसून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगत युतीच्या चर्चेला पुन्हा स्वल्पविराम दिला आहे.

परंतु युतीवर चर्चा झाली नसल्याचं सांगतानाच दुसरीकडे संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि राहणार. तर हाच मोठा भाऊ दिल्लीचं तख्त हलवणार अशी प्रतिक्रिया देत शिवसेना कुठंही नरमलेली नसल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे युतीबाबत शिवसेनेच्या भुमिकेबाबतची संदिग्धता अजून वाढल्याची चर्चा आता रंगली आहे.


अर्थसंकल्पीय अधिवेशन, दुष्काळ-राफेलवर चर्चा!

भाजपाकडून लोकसभेच्या २ जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानुसार सोमवारच्या खासदाराच्या बैठकीत युतीवर चर्चा होते का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यानुसार दुपारी मातोश्रीवर खासदारांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत युतीवर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर केवळ जुजबी चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. युतीसाठी ही बैठक बोलवण्यात आली नसून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली. त्याप्रमाणे आठ लाखांपर्यंतच वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची मागणी अर्थसंकल्पात करण्यासंबंधीचा ठराव मंजुर करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर दुष्काळ आणि राफेलवर यावेळी चर्चा झाल्याचंही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.

युतीवर केवळ जुजबी चर्चा झाली असं सांगतानाच महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ आहे आणि राहणार असं म्हणत भाजपाला पुन्हा एकदा इशारा देत सुचक विधान केलं आहे. तर भाजपावर दबाव कायम ठेवण्याचाही प्रयत्न यातून शिवसेनेनं केला आहे.


हेही वाचा -

आम्ही काय मॅरेज ब्युरो उघडलाय का? संजय राऊतांचा पुन्हा भाजपाला टोला

प्रियांका गांधीच्या समर्थनासाठी शिवसेना आली धावून



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा