Advertisement

हात हालवत आले, हात हलवत गेले- प्रकाश आंबेडकर

महाआघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित आघाडीला समाविष्ट करून देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून गेल्या दोन दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी राजगृहवर महाआघाडीसाठी चर्चा झाली. ही चर्चा निष्फळ ठरल्यानं आता काँग्रेस-राष्ट्रवादीनं एक पाऊल पुढं टाकत वंचित आघाडीला ६ जागा देण्याची तयारी दर्शवल्याची वृत्त आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना हे वृत्त फेटाळलं आहे.

हात हालवत आले, हात हलवत गेले- प्रकाश आंबेडकर
SHARES

महाआघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित आघाडीला समाविष्ट करून देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून गेल्या दोन दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी राजगृहवर महाआघाडीसाठी चर्चा झाली. ही चर्चा निष्फळ ठरल्यानं आता काँग्रेस-राष्ट्रवादीनं एक पाऊल पुढं टाकत वंचित आघाडीला ६ जागा देण्याची तयारी दर्शवल्याची वृत्त आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना हे वृत्त फेटाळलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कालही असा काही प्रस्ताव नव्हता आणि आज नाही. मंगळवारी राजगृहावर ते हात हालवत आले आणि हात हालवत गेले अशा शब्दात आंबेडकर यांनी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. तर महाआघाडीबाबत वंचित आघाडीची समितीच निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलं आहे.


म्हणून वंचित आघाडीकडे मोर्चा

भाजपा-मोदींना हटवणं हाच उद्देश ठेवत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांनी एकत्र येत महाआघाडी स्थापन केली आहे. या महाआघाडीत अधिकाधिक समविचारी पक्षांना समावून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित आघाडीलाही महाआघाडीत सामिल करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनं जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. वंचित आघाडी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीनं कामाला लागली असून गेल्या काही दिवसांपासून वंचित आघाडीनं मुंबईसह राज्यभर सभांचा धुराळा उठवला आहे. तर त्यांच्या सभांना चांगलीच गर्दीही होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीनं वंचित आघाडीला सोबत आणण्याच्या प्रयत्नांना वेग दिला आहे.


६ जागा देण्याची तयारी? 

त्याचाच भाग म्हणून मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, छगन भुजबळ आदी नेते राजगृहावर पोहचले. यावेळी आंबेडकर आणि त्यांच्यामध्ये आघाडीबाबत चर्चा झाली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे. दरम्यान वंचित आघाडीकडून लोकसभेच्या १२ जागांची करण्यात येत असून काँग्रेस-राष्ट्रवादी यासाठी तयारी नसल्यानं मंगळवारची बैठक निष्फळ ठरल्याची माहिती समोर येत आहे. तर आता काँग्रेस-राष्ट्रवादीनं ६ जागांची तयारी दर्शवल्याचं वृत्त आहे.


संदीग्ध भूमिका

त्यानुसार याविषयी आंबेडकर यांना विचारलं असता त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मंगळवारी कोणताही प्रस्ताव नव्हता आणि आम्हीही कोणताही प्रस्ताव त्यांना दिलेला नाही. ते हात हालवत आले आणि हात हालवत गेले असंही ते म्हणाले. मात्र त्याचवेळी महाआघाडीत सहभागी होण्याविषयी वंचित आघाडीची समितीच अंतिम निर्णय घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे महाआघाडीत सहभागी होण्याबाबतच्या त्यांच्या भूमिकेविषयी संदीग्धता निर्माण झाली आहे.हेही वाचा -

मराठा कुणबीच! मराठा स्वतंत्र जात नाही-राज्य मागास वर्ग आयोग

मुख्यमंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णयसंबंधित विषय
Advertisement