धवल कुलकर्णीचं मुंबई संघात कमबॅक

अनुभवी जलदगती गोलंदाज धवल कुलकर्णी याचं मुंबईच्या रणजी संघात कमबॅक झालं आहे. धवलच्या येण्यामुळे सौराष्ट्रविरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये मुंबईच्या संघाला आणखी बळकटी मिळणार आहे.

अनुभवाची कमतरता

रणजी ट्राॅफीतील ग्रुप 'ए' मध्ये मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यात शनिवारपासून मॅच सुरू होत आहे. धवल दुखापतीमुळे संघाबाहेर असल्यामुळे मुंबईला गोलंदाजीत अनुभवाची कमतरता जाणवत होती. धवलच्या समावेशामुळे मुंबईच्या गोलंदाजीची धार वाढणार आहे.

संघाची घोषणा

मुंबई क्रिकेट संघाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर संघाची घोषणा केली. यांत संघाचं नेतृत्व फाॅर्ममध्ये खेळत असलेला फलंदाज सिद्धेश लाड याच्याकडेच ठेवण्यात आलं आहे. क्वार्टर फायनलमध्ये पोहण्याची आशा जीवंत ठेवण्यासाठी मुंबईला काहीही करुन सौराष्ट्रविरुद्ध विजय नोंदवावाच लागेल.

ग्रुप ए आणि बी च्या संयुक्त क्रमवारीत मुंबई ८ अंकांसहित १३ व्या स्थानी आहे. संयुक्त क्रमवारीत पहिले ५ संघ क्वार्टर फायनलमध्ये खेळतील.

मुंबईचा संघ:

सिद्धेश लाड, श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, एकनाथ केरकर, शिवम दुबे, जय बिस्टा, आकाश पारकर, विक्रांत ओती, शुभम रंजने, कर्ष कोठारी, ध्रुमील मटकर, रायस्टन डियास, मिनाद मांजरेकर आणि तानुश कोटियान.


हेही वाचा-

मुंबईच्या रणजी टीममध्ये श्रेयस अय्यरची निवड

मुंबईच्या क्रिकेटपटूंसोबत दुजाभाव, सुनील गावस्कर यांचा निवड समितीवर धक्कादायक आरोप


पुढील बातमी
इतर बातम्या