Advertisement

मुंबईच्या रणजी टीममध्ये श्रेयस अय्यरची निवड

सध्या भारतीय ए टीम न्यूजीलंडच्या दौऱ्यावर आहे. मंगळवारी या सिरिजमधील शेवटची मॅच खेळल्यानंतर श्रेयस बडोद्याविरूद्ध खेळण्यासाठी पुन्हा भारतात परतेल.

मुंबईच्या रणजी टीममध्ये श्रेयस अय्यरची निवड
SHARES

इंडिया 'ए' कडून न्यूझीलंडमध्ये वन डे सिरिज खेळत असलेला भारतीय बॅट्समन श्रेयस अय्यर याला मुंबईच्या रणजी टीममध्ये निवडण्यात आलं आहे. एलिट ग्रुप ए मध्ये १४ डिसेंबरपासून बडोदा टीमविरूद्ध होणाऱ्या मॅचसाठी अनुभवी श्रेयसची टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

सध्या भारतीय ए टीम न्यूजीलंडच्या दौऱ्यावर आहे. मंगळवारी या सिरिजमधील शेवटची मॅच खेळल्यानंतर श्रेयस बडोद्याविरूद्ध खेळण्यासाठी पुन्हा भारतात परतेल.


टीमची घोषणा

मुंबई क्रिकेट टीमने आपल्या वेबसाईटवर सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखालील मुंबई टीमची नुकतीच घोषणा केली. यांत मागच्या काही काळापासून खराब फाॅर्मशी झगडत असलेला माजी कॅप्टन आणि अनुभवी बॅट्समन सूर्यकुमार यादव याला टीममधून बाहेर काढण्यात आलं आहे.


हार्दिक पांड्या खेळणार

तर, दुसऱ्या बाजूला दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर असलेला आॅल राऊंडर हार्दिक पांड्या या मॅचमध्ये खेळणार आहे. दुखापतीतून सावरलेला हार्दिक मुंबईविरूद्धच्या मॅचसाठी बडोदा टीमकडून मैदानात उतरणार आहे.


मुंबईची टीम अशाप्रकारे

सिद्धेश लाड (कॅप्टन), श्रेयस अय्यर, जय बिस्टा, आदित्य तरे, एकनाथ केरकर, शिवम दुबे, आकाश पारकर, कर्ष कोठारी, विक्रांत आैटी, ध्रुमिल मटकर, राॅयस्टन डियाज, मिनाद मांजरेकर, शुभम रंजने, भूपेन लालवानी आणि बद्री आलमहेही वाचा-

मुंबईच्या क्रिकेटपटूंसोबत दुजाभाव, सुनील गावस्कर यांचा निवड समितीवर धक्कादायक आरोपRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा