मेन इन ब्ल्यू अवतरले आर्मी कॅपमध्ये!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारतीय खेळाडूंनी काळ्या फिती बांधून पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यापाठोपाठ भारतीय सैन्याने दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी टीम इंडिया शुक्रवारी रांची इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आर्मी कॅप घालून मैदानात उतरली.  

शिक्षणासाठी उपक्रम

रांची इथं तिसरा एकदिवसीय सामना सुरू होण्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने सर्व खेळाडूंना आर्मी कॅप दिल्या. तसंच सहाय्यक स्टाफलाही या कॅप देण्यात आल्या. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अधिकाधिक मदत निधी मिळावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात आल्याचं बीसीसीआयनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 


हेही वाचा - 

अकरावी प्रवेशासाठी आरक्षण १०३ टक्क्यांवर!

'इथं' असेल महापौरांचं नवं निवासस्थान


पुढील बातमी
इतर बातम्या