Advertisement

अकरावी प्रवेशासाठी आरक्षण १०३ टक्क्यांवर!

यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी कॉलेजातील आरक्षण चक्क १०३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अकरावीसाठी जागाच शिल्लक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

अकरावी प्रवेशासाठी आरक्षण १०३ टक्क्यांवर!
SHARES

राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा सध्या सुरू असून त्यानंतर लगेचच सर्व विद्यार्थ्यांसह पालकांची अकरावी अॅडमिशनसाठी लगबग सुरू होणार आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावी प्रवेशात गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी कॉलेजातील आरक्षण चक्क १०३ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अकरावीसाठी जागाच शिल्लक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे यंदाची अकरावी प्रवेश प्रक्रिया कशी आणि कोणत्या निकषांवर राबविली जाणार, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 


प्रवेश मिळणार का?

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक कॉलेजांमध्ये गेल्या वर्षीपासून उच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर मागासवर्गीय आरक्षण बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बिगर अल्पसंख्याक कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी त्रास सहन करावा लागला. दरम्यान काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक व सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण तर केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के लागू केलं आहे. तसंच आधीपासूनच ओबीसी, एससी, एसटी, एनटी इत्यादी समाजांसाठी ५२ टक्के आरक्षण लागू करण्यात येत आहेत. त्याशिवाय शाळा व कॉलेज एकत्रित असणाऱ्या कॉलेजांमध्ये २० टक्के इनहाऊस कोटाद्वारे आरक्षण लागू करण्यात येत असून ५ टक्के मॅनेजमेंट कोटा देण्यात येतो. या सर्व आरक्षणाची बेरीज केली तर ती तब्बल १०३ टक्के एवढी येते. या सर्व आरक्षणामुळे आरक्षणाबाहेर असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश कुठं घ्यावा असा प्रश्न पडला आहे. 


गोंधळ कायम

यंदा दहावीच्या परीक्षेला सुमारे १६ लाख विद्यार्थी बसले असून जवळपास १५ लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. त्यामानाने अल्पसंख्याक ज्युनिअर कॉलेजची संख्या ५००, पदवी कॉलेज ३०० असून नोंदणीकृत अल्पसंख्याक संस्थांची संख्या २ हजार ७७५ एवढी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता काही कॉलेजांनी इन हाऊस कोट्याला कात्री लावली तरी ९३ टक्के आणि इनहाऊस कोटा नसलेल्या कॉलेजांमध्ये ८३ टक्के आरक्षण राहणार आहे. त्यामुळे उरलेल्या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चुरस रंगणार असून शासनाने याबाबत लवकर निर्णय घेऊन हा प्रवेश गोंधळ मिटवावा, असं मत पालक व्यक्त करत आहे.


इनहाऊस कोटा १० टक्के

याबाबत स्पष्टीकरण देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अकरावीसाठी शाळा व कॉलेजांमध्ये असणाऱ्या २० टक्के इनहाऊस कोटा कमी केला आहे. यानुसार यंदाच्या वर्षीपासून प्रवेशासाठी फक्त १० टक्के इनहाऊस कोटा ठेवण्यात येणार असून यामुळे खुल्या गटांसाठी ७ टक्केच जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबत कोणतेही टेन्शन न घेता परीक्षा द्यावी, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये नक्की प्रवेश मिळेल असाही टोला त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला आहे. 


अशी आहे आरक्षणाची टक्केवारी 


समाज
 आरक्षणाची टक्केवारी
ओबीसी, एससी, एसटी, एनटी
५२ टक्के
मराठा 
१६ टक्के
आर्थिकदृष्ट्या मागास सवर्ण
१० टक्के
इनहाऊस कोटा 
१० टक्के
मॅनजमेंट कोटा
५ टक्के




हेही वाचा -

आता येणार २० रुपयांचं नाणं

मुंबई-नाशिक लोकलला घाट मार्गाचा अडसर?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा