Advertisement

मुंबई-नाशिक लोकलला घाट मार्गाचा अडसर?

लवकरच मुंबई-नाशिक या मार्गावर प्रायोगिक स्तरावर लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र ई.एम.यू (Electric Multiple Unit ) अर्थात लोकल गाड्या घाटावरील चढण चढण्यास असमर्थ असल्याचा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्याने या लोकलच्या चाचणीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

मुंबई-नाशिक लोकलला घाट मार्गाचा अडसर?
SHARES

मुंबई ते नाशिक या दोन शहरांदरम्यान लोकलसेवा सुरू करण्याचा मध्य रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने विविध स्तरावर चाचण्याही सुरू झाल्या आहेत. लवकरच या मार्गावर प्रायोगिक स्तरावर लोकलची चाचणीही घेण्यात येणार आहे. मात्र ई.एम.यू (Electric Multiple Unit ) अर्थात लोकल गाड्या घाटावरील चढण चढण्यास असमर्थ असल्याचा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्याने या लोकलच्या चाचणीला महत्त्व प्राप्त झालं आहे.


'आरडीएसओ'चा अहवाल

मोठ्या संख्येने प्रवासी मुंबई-नाशिक असा दैनंदिन रेल्वे प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर उपनगरीय सेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाने मुंबई-नाशिक लोकल सेवेची घोषणा करत रेल्वे प्रशासनाला चाचणीचे आदेश दिले. त्यानुसार लखनौ येथील रिसर्च डिझाईन्स अँड स्टॅंडर्डस ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) च्या अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी केली. मात्र या पाहणीत कठीण चढउतार असलेल्या कसारा घाटात मध्य रेल्वेच्या लोकल चालवणे शक्य नसल्याचा अहवाल त्यांनी दिला.


हवी अद्ययावत ब्रेकींग

सोबतच या मार्गावर लोकल चालवायची झाल्यास तिला अद्ययावत ‘हेवी ब्रेक’ यंत्रणा आणि स्वयंचलित दरवाजे असणं आवश्‍यक असल्याची सूचना देखील ‘आरडीएसओ’ने केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे केलेल्या मागणीनुसार चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्यात (ICF) विशेष लोकल बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. सध्याच्या लोकलला १६ ब्रेक असतात, तर या विशेष लोकलला ३२ ब्रेक असतील. या लोकलचं काम पूर्ण झाल्यावर ती मध्य रेल्वेला सोपवण्यात येईल.

अद्ययावत ब्रेकींग यंत्रणेसोबतच घाट चढण्यासाठी लोकलला मजबूत इंजिनाचीही जोड हवी आहे. तशी जोड मिळाल्यास लोकल कसारा घाट चढू शकेल, असं रेल्वे अधिकाऱ्यांचं मत आहे. त्यामुळे घाटमार्गावर या विशेष लोकलची चाचणी यशस्वी होते की नाही याकडेचं सध्या रेल्वे अधिकाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.हेही वाचा-

अडीच तासांच्या खोळंब्यानंतर पंचवटी एक्स्प्रेस रवाना

मुंबई जगातलं १६ वं सर्वांत महागडं शहरसंबंधित विषय
Advertisement