Advertisement

अडीच तासांच्या खोळंब्यानंतर पंचवटी एक्स्प्रेस रवाना

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण स्थानकातील पत्री पूलादरम्यान मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचं कपलिंग तूटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

अडीच तासांच्या खोळंब्यानंतर पंचवटी एक्स्प्रेस रवाना
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण स्थानकातील पत्री पूलादरम्यान मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचं कपलिंग तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर तब्बल अडीच तासांच्या खोळंब्यानंतर पंचवटी एक्स्प्रेस रवाना करण्यात आली.


वाहतुकीवर परिणाम

गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. कपलिंग तुटल्याने पंचवटी एक्स्प्रेसचे इंजिनासोबतचे दोन डबे पुढे गेले आणि अन्य डबे मागेच राहिले. हा प्रकार लक्षात येताच त्वरित ट्रेन थांबवण्यात आली. त्यानंतर कपलिंग दुरूस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. अडीच तासांच्या खोळंब्यानंतर पंचवटी एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. वर्षभरापूर्वी डोंबिवली मार्गावरही काही डबे सोडून लोकल पुढं धावल्याचा प्रकार घडला होता.




हेही वाचा - 

मुंबई जगातलं १६ वं सर्वांत महागडं शहर

सेना-भाजप युतीविरोधात प्रचार करणार; मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा