Advertisement

'इथं' असेल महापौरांचं नवं निवासस्थान

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निवासस्थान आता शिवाजी पार्क परिसरामध्ये उभारण्यात येण्याची शक्यता आहे. दादर जिमखान्याच्या जागी महापौरांचे नवे निवास्थान उभारण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत.

'इथं' असेल महापौरांचं नवं निवासस्थान
SHARES

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निवासस्थान आता शिवाजी पार्क परिसरातमध्ये उभारण्यात येण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्क जिमखान्याच्या जागी महापौरांचं नवं निवास्थान उभारण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत अशा आशयाचा एक प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.


जिमखाना महालक्ष्मीमध्ये

शिवाजी पार्क जिमखान्याला त्यांच्या भूखंडाच्या बदल्यात महालक्ष्मी इथं एक भूखंड देण्यात येणार आहे. तसंच यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात महापौरांना भायखळ्यातील राणीच्या बागेत असलेल्या बंगल्यात स्थलांतरीत करण्यात आलं होतं.


मनसेचा विरोध

शिवाजी पार्क जिमखाना तोडण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. महापौर निवासस्थानासाठी दादर जिमखान्यासारख्या वास्तूला पाडणं नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचं मत मनसेकडून व्यक्त करण्यात आलं. मुंबईत अशा अनेक जागा आहेत त्या ठिकाणी महापौर निवासस्थान उभारलं जाऊ शकतं, असं मत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं. तसंच जर अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर झाला तर त्याला न्यायालयात आव्हान देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


मध्यभागी निवासस्थान हवं

मुंबईचे महापौर हे पालिकेवर निवडून गेलेले सदस्य आहेत. तसंच त्यांच्यासारख्या प्रतिष्ठेच्या पदावर असलेल्या व्यक्तीने शहराच्या मध्यभागी राहणं गरजेचं असल्याचं मत काँग्रेसचे नगरसेवक आणि विरोधीपक्ष नेता रवी राजा यांनी व्यक्त केलं. जर मुंबईचे आयुक्त पेडर रोडसारख्या जागी राहू शकतात, तर मुंबईचे महापौर राणीच्या बागेत का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.




हेही वाचा - 

महिलांना संगीत शिकवण्याचा वसा घेतलेली श्रृती पाठक

अकरावी प्रवेशासाठी आरक्षण १०३ टक्क्यांवर





Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा