MI vs RCB : आयपीएलच्या पहिल्या मॅचअगोदर विराट कोहलीचं ट्विट; वाचा काय म्हणाला

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामाला (IPL 2021) शुक्रवार ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामाना गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) या दोन्ही संघादरम्यान पार पडणार आहे. 

आजचा सामाना क्रिकेटप्रेमींसाठी खास असणार आहे. कारण दोन्ही कर्णधार हे भारतीय संघातील महत्वाचे खेळाडू असल्यानं पहिल्या सामन्यात कोणता कर्णधार बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, आयपीएलच्या प्रथम सामन्यापूर्वी बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली यानं आपल्या चाहत्यांना तसंच संघ पाठीराख्यांना एक मेसेज दिला आहे.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहली यानं आयपीएलच्या सलामीच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला मुंबईविरुद्धच्या मॅचअगोदर आपल्या चाहत्यांना तसंच आरसीबीच्या पाठीराख्यांना एक दमदार मेसेज दिला आहे. कोहलीनं आपल्या ट्विटरवरुन ४ फोटो शेअर केले आहेत. 'मी फोकस्ड आहे… आणि पुढे जाण्यासाठी मी तयार आहे', असं लिहत त्यानं आरसीबी मुंबईला नमविण्यासाठी सज्ज असल्याचं एकप्रकारे ट्विटमधून सांगण्याचा प्रयत्न केला.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या होणारा आयपीएलचा प्रथम सामना शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानावरुन (MA Chidambaram Stadium Chennai) सुरुवात होणार आहे. सामन्याच्या अर्धा तास अगोदर ठीक ७ वाजता सामन्याच्या टॉस होणार आहे. या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता.


हेही वाचा -

जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबात चुकीच्या बातम्या का?

कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींबाबत संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य


पुढील बातमी
इतर बातम्या