Advertisement

कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींबाबत संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे संभाजी भिडे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे.

कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींबाबत संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य
SHARES

वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे संभाजी भिडे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. 'कोरोना अस्तित्वात नाही. सरकारनं काहीही करू नये, ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावं. कोणत्या नालायकानं मास्क घालण्याचा सिद्धांत काढला आहे? मास्क लावण्याची गरज नाही,' असं वक्तव्य केलं.

कोरोनामुळे राज्यात गंभीर परिस्थिती झाली असून कुटुंबातील कर्त्या व्यक्तींच्या निधनानं अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच संभाजी भिडे यांनी मात्र बेजबाबदार वक्तव्य करत वाद ओढवून घेतला आहे.

लॉकडाऊनच्या विरोधात सांगलीमध्ये भाजपकडून मोर्चा आयोजित करण्यात आला होता. भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यासह विविध भाजीपाला आणि व्यापारी संघटनाही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी केलेली वक्तव्ये राज्यभरात चर्चेचा विषय झाली आहेत.

नक्की काय म्हणाले संभाजी भिडे?

१. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे. पण मुळात कोरोना हा रोगच नाही. कोरोना हा मानसिक आजार असून कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यकीत या जगण्याच्या लायकीच्या नाहीत.

२. अस्तित्वात नसलेले काळे मांजर काळ्या कूट अंधारात शोधण्यासारखा कोरोना रोगाचा प्रकार

३. कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाच्या जीवाची काळजी जो तो घेईल, सरकारनं यात लक्ष घालू नये

४. कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा, कोरोना- कोरोना आक्रोश चालला आहे. पण कोरोना अस्तित्वात नाही, लॉकडाऊनची गरज नाही.

५. जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील

६. कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केलं पाहिजे. नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा