Advertisement

जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबात चुकीच्या बातम्या का?

जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लशींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचं कारण काय? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबात चुकीच्या बातम्या का?
SHARES

महाराष्ट्राला १.०६ कोटी लस मिळाल्या आहेत. तसं ट्विट डिजीआयपीआरने ६ एप्रिल रोजी केलं आहे. यापैकी ९१ लाख लशी वापरल्या असून १५ लाख लस शिल्लक आहेत. असं असताना आज जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लशींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचं कारण काय? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून झालेल्या लशींच्या पुरवठ्याची माहिती दिली. ते म्हणाले, आतापर्यंत केवळ महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान अशा ३ राज्यांनाच १ कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत. यात गुजरात आणि राजस्थानची (राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार) लोकसंख्या समान आहे. लशींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसीकरणातील कामगिरीच्या आधारावर करण्यात येत आहे. 

आज ज्या राज्यांना कोटा दिला आहे, तितक्या लशी पुरवठ्याच्या मार्गात (पाईपलाईनमध्ये) आहेत, तो पुरवठा ९ ते १२ एप्रिल या काळात होईल. यात महाराष्ट्राला पुन्हा अधिकच्या १९ लाख लस मिळणार आहेत. उत्तर प्रदेश हे सर्वांत मोठं राज्य आहे. त्यांना ९२ लाख लसींचे डोस मिळाले आहेत. त्यापैकी ८३ लाख डोस त्यांनी वापरले असून ९ लाख डोस त्यांच्याकडे शिल्लक आहेत. हरयाणाला पहिल्या पाईपलाईनमध्ये फारसे डोस मिळाले नव्हते. त्यांना आता डोस प्राप्त होत आहेत.

हेही वाचा- मुंबईत लसीचा तुटवडा, २६ लसीकरण केंद्र बंद

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती देत आश्वस्त केलं आहे. मी स्वत:ही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोललो आहे. महाराष्ट्राशी भेदभाव होणार नाही आणि कामगिरीच्या आधारावर तत्काळ पुरवठा होईल, याबद्दल त्यांनी आश्वस्त केलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

कोरोनाविरोधातील लढाईत पहिल्या दिवसापासून केंद्र सरकारने सर्व राज्यांना सोबत घेऊन ही लढाई लढली आहे आणि महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली आहे. आजही केंद्र सरकार महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून सर्व ती मदत करत आहे.

मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही. लस येत आहेत, येत राहतील. पण, प्राथमिक सेवाही देता येत नसताना भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

(why maharashtra government closed covid 19 centers consciously devendra fadnavis raised question)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा