Advertisement

मुंबईत लसीचा तुटवडा, २६ लसीकरण केंद्र बंद

कोव्हॅक्सीनचे जे काही डोस शिल्लक राहिले आहेत ते फक्त दुसरा डोस देण्यासाठी वापरण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईला पुढील लसीचा साठा १५ एप्रिलला मिळणार असल्याने तो पर्यंत लसीकरण बंद ठेवावे लागणार आहे.

मुंबईत लसीचा तुटवडा, २६ लसीकरण केंद्र बंद
SHARES

मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तर दुसरीकडं लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईतील २६ लसीकरण केंद्र बंद करावी लागली आहेत. लस उपलब्ध न झाल्यास येत्या दोन दिवसांत आणखी काही लसीकरण केंद्र बंद होणार आहेत.

मुंबईत एकूण ११८ लसीकरण केंद्र आहेत. त्यांपैकी ७१ खाजगी केंद्र आहेत. यामधील एच.एन.रिलायन्स, ब्रिच कॅन्डी, हबीब, भाटीया, एलिझाबेथ, लायन हॉस्पिटल, सिटी केअर, लाईफलाईन, भाभा हॉस्पिटल ही लसीकरण केंद्र बंद झाली आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत १५ लाख २३ हजार ८१८ जणांना लस देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या ३३ राज्य आणि केंद्र सरकारच्या १४ तसंच खासगी रुग्णालयात ७१ केंद्रांवर लसीकरण केले जातं. खासगी रुग्णालयातील ७१ केंद्रांपैकी २६ केंद्र बंद करण्यात आली आहेत. कोव्हॅक्सीनचे जे काही डोस शिल्लक राहिले आहेत ते फक्त दुसरा डोस देण्यासाठी वापरण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईला पुढील लसीचा साठा १५ एप्रिलला मिळणार असल्याने तो पर्यंत लसीकरण बंद ठेवावे लागणार आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत कोव्हीशील्डचे १ लाख ८५ हजार तर कोवॅक्सीनचे ८ हजार ८४० इतकेच डोस बाकी होते. आता हा साठा कमी झाला आहे. मुंबईत मंगळवारी ५० हजार ५९४ तर बुधवारी ६१ हजार ८९६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. 



हेही वाचा -

मुंबई महापालिकेची नवी गाइडलाइन; आता 'या' गोष्टींनाच परवानगी

आता खासगी ऑफिसातही मिळणार कोरोना लस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा