Advertisement

आता खासगी ऑफिसातही मिळणार कोरोना लस

वर्कप्लेसमध्ये कोरोना लसीकरण राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

आता खासगी ऑफिसातही मिळणार कोरोना लस
SHARES

आता कोरोना लस घेण्यासाठी कोणत्याही खासगी किंवा सरकारी कोरोना सेंटरवर किंवा रुग्णालयात जाण्याची गरज नाही. तर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्येच कोरोना लस मिळणार (Covid vaccination at workplaces) आहे. तुम्ही जिथं काम करता तिथेच लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

वर्कप्लेसमध्ये कोरोना लसीकरण राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. खासगी आणि सरकारी कार्यालयात कोरोना लसीकरण केलं जाणार आहे.

११ एप्रिल, २०२१ पासून ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.

नियमानुसार ४५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना लस दिली जात आहे. त्यामुळे इथं सुद्धा याच निकषात बसणाऱ्या व्यक्तींना कोरोना लस मिळेल. ही लस फक्त संबंधित ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनाच मिळेल.

कर्मचाऱ्यांचे नातेवाईकांसह ऑफिसबाहेरील इतर कुणालाही ही लस मिळणार नाही, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी जारी केलेल्या या सूचनेनुसार एकावेळी फक्त १०० लोकांचं लसीकरण केलं जाईल.

सध्या ४५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना लस दिली जाते आहे. पण त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींचंही कोरोना लसीकरण करावं, अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्र लिहिलं होतं. २५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी कोरोना लस उपलब्ध करावी अशी मागणी केली होती. पण केंद्रानं सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यास नकार दिला आहे.

सर्वांचं कोरोना लसीकरण करावं, यासाठी का परवानगी दिली जात नाही, हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी सांगितलं. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेत याचं कारण दिलं आहे.

राजेश भूषण यांनी सांगितलं, "अनेक जण आम्हाला विचारत आहेत ही सर्वांना लसीकरण का केलं जात नाही आहे. याचं कारण म्हणजे या लसीकरण मोहिमेची दोन उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे मृत्यूला रोखणं आणि दुसरं म्हणजे आरोग्य सेवा प्रणालीची सुरक्षा. याचा उद्देश असा की ज्यांना कोरोना लस हवी आहे, त्यांना नाही तर ज्यांना आवश्यकता आहे त्यांना लस देणं आहे"


हेही वाचा

महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर, कोरोनाचा डबल म्युटंट तरूण, लहान मुलांसाठी घातक

महाराष्ट्रात ३ दिवसांत बंद पडू शकतं लसीकरण, फक्त १४ लाख डोस शिल्लक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा