Advertisement

महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर, कोरोनाचा डबल म्युटंट तरूण, लहान मुलांसाठी घातक

कोरोना विषाणूचा हा नवा स्ट्रेन तरूण आणि लहान मुलांसाठी अत्यंत घातक असल्याची माहिती राज्य टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी दिली.

महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर, कोरोनाचा डबल म्युटंट तरूण, लहान मुलांसाठी घातक
SHARES

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनाचा डबल म्युटंट वेगाने पसरणारा आहे. विशेषकरून कोरोना विषाणूचा हा नवा स्ट्रेन तरूण आणि लहान मुलांसाठी अत्यंत घातक असल्याची माहिती राज्य टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी दिली. 

राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, राज्य टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी आदी सहभागी झाले होते.

यावेळी टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणाले, राज्यात गंभीर परिस्थिती असून कोरोना विषाणूचा (coronavirus) नवा स्ट्रेन वेगाने पसरत आहे. हा नवा स्ट्रेन डबल म्युटंट आहे. तो तरूण आणि मुलांसाठी घातक आहे. त्यासाठी विषाणूची साखळी तोडणे हाच यावर उपाय आहे. ही दुसरी लाट त्सुनामीसारखी दिसते आहे. ती रोखण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न करावे लागतील.

हेही वाचा- महाराष्ट्रात ३ दिवसांत बंद पडू शकतं लसीकरण, फक्त १४ लाख डोस शिल्लक

तर, फेब्रुवारीपासून आतापर्यंत महाराष्ट्रात (maharashtra) कोरोनाबाधितांची ३० पट वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४ लाखांवर पोहोचली होती. गतवर्षीच्या सप्टेंबर २०२० मधील रुग्णसंख्येपेक्षा कित्येक पटींनी ही रुग्ण संख्या वाढली आहे. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरीस १२ लाखांवर रुग्णसंख्या पोहचू शकते, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी दिली.

कोरोनाचं हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. आपण २५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. पण ती नाकारण्यात आली. आपल्या मागणीवरून आता ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे. पण लसीचा साठा संपू लागला आहे. नव्या लाटेत आता तरूण वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामांसाठी फिरतो आहे. लक्षण नसलेल्यांची संख्या ७० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता आहे, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी व्यक्त केली. 

(double mutant of coronavirus is very dangerous for youth and kids)

हेही वाचा- “कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणण्याची इच्छा नव्हती पण; ही लाट प्रचंड मोठी”

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा