Advertisement

महाराष्ट्रात ३ दिवसांत बंद पडू शकतं लसीकरण, फक्त १४ लाख डोस शिल्लक

महाराष्ट्रात लसीचे केवळ १४ लाख डोस शिल्लक आहेत. दररोज ५ लाख डोसच्या सरासरीनुसार हा साठा ३ दिवसांत संपून महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडू शकतं.

महाराष्ट्रात ३ दिवसांत बंद पडू शकतं लसीकरण, फक्त १४ लाख डोस शिल्लक
SHARES

महाराष्ट्रात लसीचे केवळ १४ लाख डोस शिल्लक आहेत. दररोज ५ लाख डोसच्या सरासरीनुसार हा साठा ३ दिवसांत संपून महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडू शकतं. म्हणूनच महाराष्ट्राला दर आठवड्याला किमान ४० लाख लशींचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांच्याकडे केली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी ११ राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती राजेश टोपे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. 

राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं की, लसीकरण करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज ४ लाखांहून अधिक जणांना लसीकरण केलं जात आहे. लसीकरणाचा वेग वाढून तो साडेचार ते ५ लाखांवर नेण्यात आला असून पुढच्या २ दिवसांत दिवसाला ६ लाखांपर्यंत लसीकरण करण्याची मी हमी देत आहे. राज्यातील लस वाया जाण्याचं प्रमाणही खूपच कमी आहे. 

हेही वाचा- मुंबईत कोरोना लशीचा तुटवडा; फक्त ३ दिवस पुरेल इतकीच लस शिल्लक

आठवड्याला ४० लाख डोस हवेत

परंतु राज्यात सध्याचा लसींचा साठा लक्षात घेता केंद्र शासनाकडून तातडीने मागणीप्रमाणे पुरवठा होणे गरजेचं आहे. महाराष्ट्रात (maharashtra) लसीचे केवळ १४ लाख डोस शिल्लक आहेत. दररोज ५ लाख डोसच्या सरासरीनुसार हा साठा ३ दिवसांत संपून महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडू शकतं. लसीकरण केंद्रावर येणाऱ्यांना नाईलाजाने लस संपल्याचं सांगावं लागत आहे. म्हणूनच महाराष्ट्राला दर आठवड्याला किमान ४० लाख लशींचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे.

वेगाने काम करण्याची गरज

केंद्र सरकार लस पाठवत नाही असं नाही पण वेग कमी आहे. ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोललं जातं त्यापद्धतीने काम केलं जात नाही, हे केंद्र सरकारला आमचं सांगणं आहे. कोव्हॅक्सिनची मागणी वाढल्याने त्याचाही अतिरिक्त पुरवठा करावा, अशी मागणीही राजेश टोपे यांनी केली. 

वयोगट वाढवा

राज्यात २५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली आहे. राज्यात आढळणाऱ्या रुग्णसंख्येत २५ ते ४० वयोगटातील लोकांचं प्रमाण अधिक आहे. या वयोगटातील नागरिकांना व्यवसायानिमित्त बाहेर पडावं लागतं. यामुळे या वयोगटाचं इंफेक्शन कमी करायचं असेल तर लवकरच १८ पुढील सर्वांचं लसीकरण गरजेचं आहे. ही बाब संदर्भात पुनरूच्चार बैठकीत केल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

(only 3 days covid 19 vaccine stock available in maharashtra says rajesh tope)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा