Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

मुंबईत कोरोना लशीचा तुटवडा; फक्त ३ दिवस पुरेल इतकीच लस शिल्लक

या कोरोनाला मुळापासून नष्ट करण्यासाठी जलदगतीनं लसीकरण केलं जात आहे. मात्र, अस असलं तरी नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

मुंबईत कोरोना लशीचा तुटवडा; फक्त ३ दिवस पुरेल इतकीच लस शिल्लक
SHARES

वाढत्या कोरोनाच्या (coronavirus) प्रादुर्भावापासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार राज्यभरात लसीकरण सुरू केलं आहे. या कोरोनाला मुळापासून नष्ट करण्यासाठी जलदगतीनं लसीकरण केलं जात आहे. मात्र, अस असलं तरी नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे मुंबईत लसीचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. याबाबत स्वत: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी माहिती दिली आहे.

मुंबईत (mumbai) सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लशींचे मिळून १ लाख ८५ हजार इतकेच डोस शिल्लक आहेत. तसंच, मुंबईला आता पुढचा लसीचा साठा १५ एप्रिलनंतर मिळणार आहे. त्यामुळे येत्या तिनेक दिवसांच्या काळात मुंबईत लशीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

मुंबईत दररोज ५० हजार व्यक्तींना लशींचे डोस दिले जात आहेत. याबरोबरच मुंबईतच्या जम्बो कोविड सेंटर्समध्ये दिवसाला दीड ते २ हजार लसींचे डोस दिले जात आहेत अशी माहिती, महापौर पेडणेकर यांनी दिली. 'मुंबईत कोविशिल्ड लशीचे एकूण १ लाख ७६ हजार ५४० डोस शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे कोव्हॅक्सिन या लशीचे ८ हजार ८४० डोस शिल्लक आहेत. हे पाहता येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मुंबईत लशीचा तुटवडा निर्माण होईल', असं किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

मुंबईला पुढील लसीचा साठा १५ एप्रिलपर्यंत उपल्बध होणार आहे. तोपर्यंत मुंबईत लसीचा तुटवडा निर्माण होणार आहे. लसींच्या तुटवड्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकारला जबाबदार ठरवले आहे. 'वरवर माया आणि पोटभर जेव ग बया', असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे लशीच्या साठ्याची मागणी केलेली आहे. राज्य सरकार पत्र देखील पाठवत आहे. तरी आम्हाला लस मिळत नाही, असा तक्रारीचा सूर महापौरांनी लावला आहे.हेही वाचा -

गोरेगाव, वांद्रे आणि चेंबूरमध्ये ७ दिवसात सापडले सर्वाधिक कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात ८१ लाखापेक्षा अधिकांना कोरोना लसीचा पहिला डोस, केंद्राकडून कौतुक


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा