Advertisement

पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्यांमध्ये मायक्रो कंटेन्मेंट झोन

मुंबई महापालिकेने नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. नियम मोडणाऱ्या सोसायटींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास अशी इमारत सील केली जाते.

पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्यांमध्ये मायक्रो कंटेन्मेंट झोन
SHARES

मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने कडक निर्बंध लावले आहेत. मुंबई महापालिकेने ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सोसायटी मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केल्या आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तर दुसऱ्यांदा नियम न पाळल्यास २० हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई महापालिकेने नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. नियम मोडणाऱ्या सोसायटींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास अशी इमारत सील केली जाते. या सोसायटय़ा मायक्रो कंटेन्मेंट घोषित करण्यात येणार आहेत. सोसायट्यांनी तसा गेटबाहेर फलक लावणं आवश्यक आहे. या सोसायट्यांनी कोविड नियम पाळणं बंधनकारक असून बाहेरील व्यक्तीस सोसायटीत प्रवेश देऊ नये. संबंधित गृहनिर्माण सोसायटीने या सर्वांचे निरीक्षण करून नियमाच्या अंमलबजावणीसाठी जबादारी घ्यावी, असे आदेश पालिकेने दिले आहेत.  

सोसायटीने नियमाची अंमलबजावणी न केल्यास सोसायटीला १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. संबंधित सोसायटीने पुन्हा दुर्लक्ष करून नियम मोडल्यास २० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. 

कंटेन्मेंट इमारतींसाठी नियमावली 

- इमारतीबाहेर पोलीस तैनात करण्यात येतील.

- बाहेरील व्यक्तीला सोसायटीत प्रवेश बंदी.

- वर्तमान पत्र विक्रेत्यांनी सोसायटीच्या गेटवर वर्तमानपत्र द्यावे.

-  जीवनावश्यक वस्तू आदी साहित्यही सोसायटीच्या गेटवर स्विकारावे.

-  सोसायटीतील व्यक्तीला कोरोना चाचणी करायची असल्यास त्यांनी लॅबच्या व्यक्तीला घरी बोलवावे.

- कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर पडल्यास एफआयआर दाखल होणार. 



हेही वाचा -

  1. परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वरंटाईन सक्तीचं

  1. कोरोनाची लक्षणं नसलेल्यांची प्रतिजन चाचणी होणार नाही

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा