Advertisement

मुंबई महापालिकेची नवी गाइडलाइन; आता 'या' गोष्टींनाच परवानगी

मुंबई पालिकेने आधीच्या आदेशात काही बदल केले आहेत. त्यात होम डीलिव्हरी तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांबाबत दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेची नवी गाइडलाइन; आता 'या' गोष्टींनाच परवानगी
SHARES

राज्यात कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर होत चालली आहे. मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ८० लाखांच्यावर पोहचला असून आता कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेनं कडक निर्बंध जारी केले होते. मात्र, या निर्बंधांमुळं अनेकांवर आर्थिक संकट ओढवण्याचं संकट असल्यानं आधी ज्या गाइडलाइन जारी करण्यात आल्या होत्या त्यात काही बदल करण्यात आले आहेत.

राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन ५ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान प्रत्येक वीकेंडला शनिवार आणि रविवार असे २ दिवस कडक लॉकडाऊन आणि इतर दिवशी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी करताना प्रत्येक महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला स्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसारच मुंबई पालिकेने आधीच्या आदेशात काही बदल केले आहेत. त्यात होम डीलिव्हरी तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांबाबत दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. 

नवीन गाइडलाइन्स

 • विद्यार्थी वा उमेदवार परीक्षा केंद्र गाठण्यासाठी पालकासह (एक पालक) प्रवास करू शकतील.
 • सोबत वैध हॉल तिकीट असणे आवश्यक आहे.
 • खाद्य पदार्थ आणि अत्यावश्यक वस्तूंची २४x७ होम डीलिव्हरी करता येईल.
 • ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांमार्फतच होम डीलिव्हरी करणे बंधनकारक असेल.
 • वीकेंड लॉकडाऊनवेळी हॉटेलमध्ये प्रत्यक्ष जावून पार्सल आणता येणार नाही.
 • हॉटेल होम डीलिव्हरी करू शकतं.
 • वीकेंड लॉकडाऊन दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेले फूडस्टॉल तसेच फळ विक्रेते पार्सल आणि टेक अवे सेवा देवू शकतात. 
 • स्टॉलजवळ उभं राहून पदार्थ खाण्याची परवानगी नसेल.
 • मोलकरीण, आचारी, चालक, मदतनीस, नर्स आणि वैद्यकीय सहायक यांना परवानगी असेल.
 • सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तीला घरी जावून ते सेवा देवू शकतील.
 • नेत्र विकार तज्ञ तसेच चष्म्याची दुकानं राज्य सरकारने जी वेळ ठरवून दिली आहे त्या वेळेत सुरू ठेवता येतील.
हेही वाचा -

 1. परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वरंटाईन सक्तीचं

 2. कोरोनाची लक्षणं नसलेल्यांची प्रतिजन चाचणी होणार नाही
Read this story in English
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा