मेट्रो 9 च्या कंत्राटदाराला 40 लाखांचा दंड

काशिमीरा (kashimira) येथे मेट्रो 9 (metro 9)च्या कामादरम्यान रस्ता खचून डंपर उलटल्याने 25 वर्षीय चालकाचा (driver) मृत्यू झाला. त्यावरून एमएमआरडीएने मेट्रो कंत्राटदाराला 30 लाखाचा तसेच कामाच्या सल्लागाराला 10 लाखाचा असा एकूण 40 लाखाचा दंड आकारला आहे.

मिरा भाईंदर (bhayander) मेट्रो मार्गिका 9 चे काम सध्या सुरू आहे. या कामाचे कंत्राट ‘जे कुमार’  या संस्थेला देण्यात आले आहे. गेल्या चार वर्षात मेट्रोचे पिलर उभारण्यासाठी खोलवर खड्डा करण्यात आला. यामुळे आसपासच्या रस्त्याची  दूरवस्था झाली. त्यामुळे त्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम देखील त्याच कंत्राटदाराकडून हाती घेण्यात आले होते. 

दरम्यान 4 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास काशिमीरा येथे रस्ता खचला. त्यात पडून आशिष कुमार (25) या चालकाचा मृत्यू (death) झाल्याची दुर्घटना घडली.

चालकाला वाहन मागे घेताना अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचा एमएमआरडीएचा अंदाज आहे. मात्र मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी एमएमआरडीएने ‘शून्य अपघात धोरण’ राबवले होते.

परिणामी या अपघातामुळे एमएमआरडीएच्या (MMRDA) मूळ धोरणालाच धक्का बसला. तसेच कंत्राटदाराच्या कामातील निष्काळजीपणा समोर आला आहे. त्यामुळे घटनेची दखल घेत जे कुमार या कंत्राटदाराला 30 लाखाचा आणि मेट्रोमार्गिकेच्या सल्लागाराला 10 लाखाचा दंड ठोठावला, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

मेट्रो मार्गीका उभारणीच्या कामादरम्यान घडलेल्या अपघातानंतर काशिमीरा पोलिसांनी एमएमआरडीए प्राधिकरणाचा अभियंता शशांक गुप्तावर मृत्यूस कारणीभूत, तसेच निष्काळजीपणासाठी कलम 106 व 125 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


हेही वाचा

धारावी रहिवाशांची आरोग्य विम्यासाठी नोंदणी

खारफुटीवरील भराव रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

पुढील बातमी
इतर बातम्या