धारावी सोशल मिशन (DSM)च्या पीपल्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हच्या माध्यमातून धारावीतील 300 हून अधिक रहिवाशांची शासकीय कल्याणकारी योजनांतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.
धारावीतील (dharavi) लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना आरोग्य विमा (health insurance) योजनेचा लाभ देण्यात आला आहे. एकूण विम्याची रक्कम 10 कोटी रुपये इतकी आहे. तसेच इतर शासकीय योजनांसाठी 197 जणांनी नोंदणी केली आहे.
मुंबईतील (mumbai) धारावीतील बहुसंख्य लोक असंघटित क्षेत्रात काम करतात. या क्षेत्रातील व्यक्तींसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत.
आयुष्मान भारत, ई-श्रम कार्ड आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यासारख्या कल्याणकारी योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक आणि आरोग्य सुरक्षा प्रदान करतात. परंतु जनजागृतीचा अभाव आणि इतर कारणांमुळे अनेक कामगार या योजनांच्या लाभापासून दूर राहतात.
ही बाब लक्षात घेऊन अशा योजनांचा लाभ धारावीतील रहिवासी आणि कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी डीएसएमने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत (dharavi social mission) 300 हून अधिक रहिवाशांची नोंदणी करून त्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळाले आहे.
एकूण विम्याची रक्कम 10 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर पीपल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह अंतर्गत ई-लेबर कार्डसह इतर योजनांसाठी 197 जणांची नोंदणी करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत आरोग्य विमा आणि इतर योजनांचा लाभ मिळत असल्याने धारावीतील रहिवाशांसाठी हा दिलासा आहे.
हेही वाचा