मुंबई विमानतळावर ड्रोन सापडला

गुरुवारी दुपारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हँगर भागात एका अज्ञात व्यक्तीने ड्रोन उडवले.

मुंबई विमानतळावर ड्रोन सापडला
SHARES

गुरुवारी दुपारी मुंबई (mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एका अज्ञात व्यक्तीने ड्रोन (drone) उडवल्याचे समोर आले आहे. विमानाचे पार्ट्स आणि त्याचं काम करण्यात येणाऱ्या भागात हा ड्रोन सापडला. हा भाग जास्त संवेदनशील असतो. सध्या विमानतळ (mumbai airport) पोलिस या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमानतळ पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल विनोद शिरसाट हे रात्री गस्त घालत होते. तेव्हा त्यांना रात्री 12.30 वाजता फोन आला की, जुन्या एअर इंडिया एअरलाइन्सच्या टॅक्सीवेजवळ टर्मिनल 1 वर ड्रोनसारखी वस्तू कोसळली आहे. 

कॉन्स्टेबल शिरसाट यांनी बीव्हीजी क्लिनर कर्मचारी इम्रान मुराद यांच्याशी बोलून त्याला अज्ञात वस्तू तपासण्यासाठी पाठवले. तपासणीनंतर ही वस्तू ड्रोन असल्याचे स्पष्ट झाले. इम्रान मुराद यांनी हे ड्रोन त्याचा सुपरवायझर बाबू नाटेकर यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच बाबू नाटेकर त्यांनी विमानतळ पोलिसांना सतर्क केले.

मुंबई पोलिसांनी संवेदनशील क्षेत्रात ड्रोन उडवण्यास मनाई केल्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या 223 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विमानतळाच्या सुरक्षा यंत्रणेने ड्रोन चालवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला पण संबंधित व्यक्ती सापडला नाही.

विमानतळ पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही ड्रोनच्या मालकाचा (drone operater) शोध घेत आहोत.”



हेही वाचा

मुंबईकर गारठले! किमान तापमानात घट

‘लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व अर्जांची पुन्हा छाननी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा