नवी मुंबईत माथाडी कामगाराची आत्महत्या

नवी मुंबईतील तुर्भे इथं राहणाऱ्या एका माथाडी कामगारानं शनिवारी सकाळी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अरुण भडाले (२६) असं या माथाडी कामगाराचं नाव असून त्यांनं राहत्या घरीचं गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याने गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याचं समजतं आहे.

सुसाइड नोट सापडली

अरुण यांच्या घरात आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये त्यांनी गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याचं लिहिलं आहे. तसंच मराठा आरक्षणाचाही चिठ्ठीत उल्लेख असल्याचं म्हटलं जात आहे.

वांद्र्यात ४ जणांची आत्महत्या

याआधी वांद्र्यातील शासकीय वसाहत क्रमांक २ मध्ये राहणाऱ्या राजेश भिंगारे यांनी देखील गरिबीला कंटाळून आपली पत्नी आणि २ मुलांसह विष पिऊन आत्महत्या केली होती. राजेश भिंगारे मंत्रालयातील शिधावाटप कार्यालयात नोकरी करत होते. त्यावेळी राजेश यांच्या घरात आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली होती. यामध्ये त्यांनी गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याचं लिहिलं होतं.


हेही वाचा-

ठाण्यात तरूणीची दिवसाढवळ्या हत्या

मधुचंद्राच्या रात्री घात झाला, अंथरूणात 'ती' ऐवजी 'तो' निघाला!


पुढील बातमी
इतर बातम्या