ठाण्यात तरूणीची दिवसाढवळ्या हत्या


ठाण्यात तरूणीची दिवसाढवळ्या हत्या
SHARES

एका २० वर्षीय तरूणीची चाकूने वार करून दिवसाढवळ्या हत्या केल्याचा प्रकार ठाण्यात घडल्याने एकच खळबळ माजली आहे. प्राची विकास झाडे (२०) असं या तरूणीचं नाव आहे. पूर्व द्रूतगती महामार्गाजवळील नितीन कंपनीजवळ हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी अाकाश पवार (२५, भिवंडी) या तरूणाला पोलिसांनी अटक केली अाहे. 


कधी घडली घटना?

 शनिवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास प्राची अाॅफिसला निघाली होती. यावेळी ती पूर्वद्रुतगती मार्गावरून जात असताना अाकाश पवार  याने तिला थांबवले अाणि तिच्या मानेवर अाणि पोटावर चाकूने वार केले. काहींनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हातात चाकू असल्याने पुढे कोणी आले नाही. त्यानंतर तो तेथून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या प्राचीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याअगोदरच तिचा मृत्यू झाला अाहे. प्राची कोपरीत राहणारी असून ठाण्यातील बेडेकर काॅलेजमध्ये ती बीकाॅमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तसंच ती नोकरीही करत होती.


प्रेमसंबंधांतून हत्या

प्राची अाणि आकाश हे एकमेकांनी ३ वर्षांपासून ओळखत असून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं समोर अालं अाहे. मात्र, दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. जून महिन्यामध्ये अाकाशने प्राचीला मारहाणही केली होती. तसंच अाकाशने प्राचीला धमकीही दिली होती. याप्रकरणी तिने पोलिस ठाण्यात तक्रारही केली होती. हेही वाचा-

मरोळमध्ये भंगार व्यावसायिकावर गोळीबार

अभिनेत्री दीप्ती नवल यांना खंडणीचा मेलसंबंधित विषय