अभिनेत्री दीप्ती नवल यांना खंडणीचा मेल

दीप्ती नवल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना स्पॅम मेलमध्ये धमकीचा ई-मेल आला होता. त्यांच्याकडे खंडणी म्हणून ५६०० डॉलर इतकी रक्कम बिटकॉईनच्या स्वरुपात मागण्यात आली होती.

अभिनेत्री दीप्ती नवल यांना खंडणीचा मेल
SHARES

ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल यांना इ-मेल पाठवून त्यांच्याकडून बिटकॉईनच्या स्वरूपात ४ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. नवल यांना मंगळवारी रात्री खंडणीचा मेल आला. या मेलमध्ये त्यांचा यूजरनेम आणि पासवर्ड देखील लिहिण्यात आला होता.


शोध सुरू

या प्रकरणी नवल यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सायबर सेलच्या मदतीने हा ई- मेल कोणत्या सर्व्हरवरून पाठवण्यात आला याचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.


किती खंडणी मागितली?

दीप्ती नवल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना स्पॅम मेलमध्ये धमकीचा ई-मेल आला होता. त्यांच्याकडे खंडणी म्हणून ५६०० डॉलर इतकी रक्कम बिटकॉईनच्या स्वरुपात मागण्यात आली होती. त्याचप्रमाणं या मेलमध्ये नवल यांना '२४ तासांच्या आत ३.९ लाख रुपये दिले नाही, तर वेबसाईटवर सर्च केलेल्या व्हिडिओ व्हायरल करू' अशा प्रकराची धमकी देण्यात आली आहे.

साइबर क्राइम तज्ज्ञांच्या मते, धमकीनं भरलेले स्पॅम मेल कुणाच्याही ई-मेलवर येऊ शकतात. त्यामुळं अशा प्रकारच्या ई-मेलकडं युजर्सनी दुर्लक्ष करावं.



हेही वाचा-

बोरिवली हत्येतील अारोपीला अटक

फसवणुकीच्या आरोपाखाली दिग्दर्शकाला अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा