मरोळमध्ये भंगार व्यावसायिकावर गोळीबार


मरोळमध्ये भंगार व्यावसायिकावर गोळीबार
SHARES

 मरोळ परिसरात एका भंगार व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अस्लम खान (५८) असं या भंगार व्यावसायिकाचं नाव असून गोळीबारात ते गंभीर जखमी झाले अाहेत. त्यांना होली स्पिरीट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  या हल्ल्यामागचं कारण अद्याप समजू शकलं नसून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत अाहेत.


हल्लेखोरांच्या चेहऱ्यावर मास्क 

अस्लम हे अंधेरीतील (पूर्व) मरोळ येथील चर्च रोडवर जॉर्ज अपार्टमेंटमध्ये राहतात.  शुक्रवारी रात्री अस्लम  इमारतीखाली त्यांच्या गाडीतून उतरत असताना मोटरसायकलवरून दोघे अाले. त्यांनी अस्लम यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यामधील एक गोळी अस्लम यांच्या पोटाला लागली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी यावेळी चेहऱ्यावर मास्क लावला होता. गोळीबार केल्यावर हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले. याप्रकरणी सय्यद आलम मलिक (३३) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली अाहे.  या प्रकरणी पोलिसांनी दोघा अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस अस्लम आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करत आहेत.



हेही वाचा -

मधुचंद्राच्या रात्री घात झाला, अंथरूणात 'ती' ऐवजी 'तो' निघाला!

अभिनेत्री दीप्ती नवल यांना खंडणीचा मेल




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा