७४१ एसआरपीएस जवानांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबई पोलिसांवर वाढता ताण लक्षात घेता, राज्यसरकारने राज्य राखीव पोलिस दलाच्या(एसआरपीएफ) जवांना पोलिसांच्या मदतीसाठी मुंबईच्या रस्त्यांवर उतरवले. मात्र या महामारीने त्यांना देखील सोडलेले नाही. राज्यात आतापर्यंत ७४१ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुदैवाने त्यातील ६४८ जवानांची कोरोनावर मात केली आहे.

हेही वाचाः- MH - CET परीक्षा देखील पुढे ढकलल्या, नव्यानं जाहीर होणार तारखा

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रचंड ताण होता. त्यात स्वतः पोलिसांनाही कोरोनाची लागण होत होती. अशा परिस्थितीत पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांना मुंबई, पुणे, मालेगाव अशा विविध ठिकाणी पाठवण्यात आले होते. पण राज्य राखीव पोलिस दलातील जवानांनाही मोठ्याप्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यभरात आतापर्यंत ७४१ एसआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील ६४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दुर्दैवाने जालन्यातील गट क्रमांक ३ चे कमांडर असलेल्या उपनिरीक्षकाचा यात वीरगती प्राप्त झाली आहे. एसआरपीएफमधील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू होता. जालन्यावरून बंदोबस्तासाठी ते मुंबईत आले होते. ते ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तैनात होते व राहण्यासाठी सांताक्रुझ पोलिस ठाण्यात होते. पुढे बंदोबस्ताची जबाबदारी संपल्यानंतर त्यांची प्लाटून पुढे जालन्यात परतली.

हेही वाचाः- मालाडसह ४ परिसरांचा आयुक्तांनी घेतला आढावा

पण या अधिका-याला ताप असल्यामुळे ते मुंबईत उपचार घेत होते. २१ जूनला उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईत कार्यरत ८२ राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनाही आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. पाच अधिकारी व ७७ जवानांचा समावेश आहे. राज्यातील शहरी भागांमध्ये तैनात एसआरपीएफ जवानांना सर्वाधिक कोरोनाची लागण झाली आहे. एका वेळेला ५०-६० जवानांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर मात्र तात्काळ वरिष्ठ अधिका-यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरूवात केली. त्यानंतर हा आलेख कमी झाला असून ९३ एसआरपीएफ जवान व अधिकारी कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यातील बहुसंख्य जवान व अधिका-यांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षण आहेत

पुढील बातमी
इतर बातम्या