Advertisement

MH - CET परीक्षा देखील पुढे ढकलल्या, नव्यानं जाहीर होणार तारखा

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

MH - CET परीक्षा देखील पुढे ढकलल्या, नव्यानं जाहीर होणार तारखा
SHARES

कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता राज्य सरकारनं विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

विद्यार्थी आणि पालकांकडून प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्यानं मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व परीक्षांच्या तारखा नव्यानं जाहीर करण्यात येतील', असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

'राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत' असं उदय सामंत यांनी म्हटलं.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली होती.

'महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने! अंतिम वर्ष परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबतही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रेग्युलेटरी बॉडींना कळवण्याचा निर्णय झाला,' असं ट्वीट प्राजक्त तनपुरे यांनी केलं होतं.

दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अंतिम वर्ष परीक्षा रद्द करणं कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. पण राज्य सरकार आपल्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम होतं. त्यामुळे राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल या नव्या संघर्षाची चर्चा होती.



हेही वाचा

SSC-HSC Results: जुलै अखेरपर्यंत लागणार दहावी, बारावीचा निकाल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा