Advertisement

BA, Bsc आणि Bcom च्या परीक्षा होणार नाहीच- उदय सामंत

बीए, बीएएसस्सी आणि बीकॉमच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांसोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

BA, Bsc आणि Bcom च्या परीक्षा होणार नाहीच- उदय सामंत
SHARES

बीए, बीएएसस्सी आणि बीकॉमच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांसोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवार १९ जून २०२० रोजी (maharashtra government cancels final year BA Bsc and BCom degree exams says uday samant) केली आहे. एटीकेटी परीक्षांसंदर्भात येत्या २ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधताना सामंत यांनी ही माहिती दिली.

टीका झाली तरी

फेसबुक लाइव्हद्वारे साधलेल्या संवादात उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अव्यवसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला. परंतु यासंदर्भातील घोषणा झाल्यावर सरकारच्या निर्णयावर काहीजणांकडून टीका झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी देखील याबाबत एक पत्र पाठवल्याने विद्यार्थी-पालकांच्या मनातील गोंधळ वाढला. परंतु राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून मी स्वत:, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव अजोय मेहता इ. उपस्थित होते. 

हेही वाचा - Coronavirus Updates : यंदा पदवी परीक्षा होणार नाहीत?

लेखी लिहून द्या

या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार बीए, बीएएसस्सी आणि बीकॉम या अंतिम वर्षाच्या अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मागील सर्व सत्रांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अंतिम सत्रातील परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवं असल्यास, त्यांनी तसं लेखी स्वरुपात लिहून दिल्यास विद्यापीठाने योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल जाहीर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांना पदवी प्रदान केली जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांनीही विद्यापीठाला लेखी लिहून द्यायचं आहे. विद्यापीठाकडून या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल आणि कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून सोशल डिस्टन्सिंग ठेवत या विद्यार्थ्यांची ऐच्छीक परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. 

'या' परीक्षाही रद्द

व्यावसायिक अभ्यासक्रम जसे. अभियांत्रिकी, फार्मसी, हाॅटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापन शास्त्र, वास्तुकला, विधी, अध्यापनशास्त्र इ. बाबतीत देखील अव्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच ऐच्छीक परीक्षांचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे. परंतु या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या मुख्य संस्था किंवा अॅपेक्स बाॅडी या केंद्र सरकारच्या अंतर्गत येत असल्याने राज्य सरकारकडून या परीक्षा रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव त्यांना पाठवण्यात येणार आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

सोबतच एटीकेटी आणि बॅकलाॅगच्या परीक्षांबाबत संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू, अधिकारी यांच्याशी विचारविनिमय करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात येईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. 

हेही वाचा - एमपीएससी परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा