Advertisement

‘इस्रो सायबरस्पेस’ घरी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनोखी स्पर्धा

लहान मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थे'नं (इस्रो) काही ऑनलाइन 'इस्रो सायबरस्पेस कॉम्पिटीशन'चं आयोजन केलं आहे.

‘इस्रो सायबरस्पेस’ घरी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनोखी स्पर्धा
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं शालेय मंडळानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं अनेक विद्यार्थी घरी ऑनलाइनच्या माध्यमातून विविध कोर्सचं शिक्षण घेत आहेत. अशातच घरीच असलेल्या लहान मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थे'नं (इस्रो) काही ऑनलाइन 'इस्रो सायबरस्पेस कॉम्पिटीशन'चं आयोजन केलं आहे. 

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक वेळ स्क्रीनसमोर बसण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी ऑफलाइन तयार केलेली गोष्ट पालकांनी ऑनलाइन सबमिट करायची आहे.

इयत्ता १ली ते ३च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे. ‘ए थ्री’ आकाराच्या पांढऱ्या कागदावर किंवा चार्ट पेपरवर जलरंग, मेणाच्या किंवा पेन्सिलच्या रंगांनं चित्र काढावं. पालकांनी चित्राचं छायाचित्र काढून अथवा ते स्कॅन करून पीडीएफ किंवा जेपीईजी स्वरूपात पाठवावं.

इयत्ता ४थी ते ८वीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर प्रतिकृती तयार करायची आहे. कार्डबोर्ड, कागद, कपडे, चिकटपट्टी (अधेसिव्ह्ज टेप), रंग आणि गोंद यांशिवाय अन्य कोणतेही साहित्य वापरू नये. प्रतिकृतीची विविध बाजूंनी चार छायाचित्रे काढावीत. कमाल दोन ‘ए फोर’ आकाराच्या कागदांवर छायाचित्रे चिकटवून त्याबाबत माहिती लिहून पीडीएफ स्वरूपात पाठवावं. 

इयत्ता ९वी-१०वीच्या विद्यार्थ्यांनी ‘ए फोर’ आकाराच्या कागदावर हिंदी किंवा इंग्रजी भाषेत निबंध लिहावा. टंकलिखित आणि इंटरनेटवरून घेतलेला मजकूर स्वीकारला जाणार नाही. लिहिलेल्या निबंधाचे छायाचित्र पीडीएफ स्वरूपात पाठवावं.

इयत्ता ११वी, १२वीसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. त्याची माहिती इस्रोच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. भारतातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच ही स्पर्धा असून नि:शुल्क आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांतील इयत्ता गृहीत धरली जाणार आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षांचे शाळेचे ओळखपत्र स्वीकारलं जाईल.

सहभागी होण्यासाठी २४ जूनपर्यंत www.isro.gov.in/icc-2020 या संकेतस्थळावर नोंदणी करावी. एक विद्यार्थी एकाच स्पर्धेत भाग घेऊ शकतो. सर्वोत्कृष्ट ५०० विद्यार्थ्यांची नावे संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. ईमेलद्वारे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

'असा' घ्या सहभाग

  • कागदाच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात नोंदणीकृत संपर्क क्रमांक लिहावा.
  • अन्य कोणतीही माहिती लिहिल्यास बाद ठरवण्यात येईल.
  • फाइलचे नाव नोंदणीकृत संपर्क क्रमांक असावा.
  • स्पर्धेसाठीचे विषय स्पर्धेच्या दिवशी ईमेलद्वारे पाठवले जातील.
  • संकेतस्थळावरही उपलब्ध असतील.
  • अधिक माहिसाठी : संकेतस्थळ https://www.isro.gov.in/icc-2020, ईमेल आयडी – icc-2020@isro.gov.in, संपर्क –०८० -२३५१५८५० (सकाळी १० ते सायं. ५) संपर्क साधावा.



हेही वाचा -

यंदा सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पावसाची शक्यता

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, 'या' योजनेवर परिणाम



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा