Advertisement

यंदा सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पावसाची शक्यता

मान्सून मिशन मॉड्युलनुसार यंदा पाऊस सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक बरसणार आहे.

यंदा सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पावसाची शक्यता
SHARES

मुंबईत मान्सूननं हजेरी लवली असून, पावसाच्या सरी कोसळत आहेत. तुर्तास पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र, हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याशिवाय, येत्या काही दिवसांतच मान्सून संपूर्ण देश व्यापणार आहे. तसंच, मान्सून मिशन मॉड्युलनुसार यंदा पाऊस सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक बरसणार आहे. तर महाराष्ट्रातही पाऊस सराससरी एवढा कोसळणार आहे.

देश व्यापतानाच मान्सूनवर इतर कोणतीही हवामान प्रणाली प्रभाव टाकणार नाही. त्यामुळं केवळ आताच नाही तर पुढील काळातही मान्सूनवर कोणत्याही हवामान प्रमाणालीचा प्रभाव राहणार नाही. परिणामी मान्सूनवर अल निनोचे संकट नाही. त्यामुळं मान्सूनचा जोरदार वर्षाव होणार असल्याचं समजतं. इतिहास पाहिल्यास अल निनो आणि ला निना हे सर्वसाधारणपणे एप्रिल ते जून या महिन्यादरम्यान विकसित होतात. त्यानंतरच्या काळात ते सक्रिय असतात.

अल निनो, ला निनाची स्थिती ९ ते १२ महिने असते. कधी कधी २ वर्षेदेखील त्याचे अस्तित्त्व जाणवते. अल निनो २ ते ७ वर्षांनी पुन्हा सक्रिय होतो. सध्या प्रशांत महासागरातील हवामानुसार यावेळी अल निनोचा प्रभाव राहणार नाही. प्रशांत महासागरातील पूर्व आणि मध्य क्षेत्रात जिथे निनो असण्याचे संकेत मिळतात किंवा मिळत नाही ते क्षेत्र गेल्या ८ महिन्यांपासून उष्ण राहिले. त्यानंतर समुद्राच्या तापमानात घट झाली आणि आता अशी आशा आहे की, मान्सून काळात समुद्रावरील तापमान वाढणार नाही. म्हणजेच अल निनोचा प्रभाव मान्सूनवर राहणार नाही. याचवेळी ला निनाची स्थिती निर्माण होईल. मात्र त्याचा प्रभाव तेवढा राहणार नाही. 



हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईतील 'इतक्या' इमारती पुन्हा पुर्वरत

कोरोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील सर्वाधिक रुग्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा