Advertisement

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, 'या' योजनेवर परिणाम


अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, 'या' योजनेवर परिणाम
SHARES

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेता शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व कॉलेजच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तसंच, मागील अनेक दिवसांपासून परीक्षा होणार की नाही यावरून गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळच आहे. मात्र, विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचं राज्य सरकारनं ठरविलं असल्यानं त्याचा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनांवर परिणाम होणार आहे.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी किमान गुणांची अट आहे. अंतिम वर्षांची परीक्षाच झाली नाही, तर विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळविता येणार नाही. परिणामी त्यांच्याकडून परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी निसटू शकते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षांच्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर विद्यार्थी आपले पुढील शैक्षणिक वा नोकरीविषयक नियोजन करीत असतात. बहुतांश मुले अंतिम वर्षांतच अभ्यास करून अधिकाधिक गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, जर अंतिम वर्षांची परीक्षाच झाली नाही, तर त्यांना ही संधी मिळणार नाही. पदवी वा पदव्युत्तर पदवीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठीचे प्रवेशही निश्चित होतात, त्यात आता अडचण निर्माण होणार आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १७० जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १२४२ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४१ रुग्ण दगावले आहेत. तर २० जून रोजी १३६ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १९ जून रोजी रोजी एकूण ११४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

या शिवाय, रविवारी मुंबईत कोरोनाचे १२४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ६६ हजार ५०७ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  करोनाचे ६२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३३ हजार ४९१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईतील 'इतक्या' इमारती पुन्हा पुर्वरत

कोरोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील सर्वाधिक रुग्ण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा