Advertisement

मालाडसह ४ परिसरांचा आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबईतील सहा विभागांमध्ये मिशन झिरो राबवण्यात येणार आहे. यानुसार दोन ते तीन आठवड्यात रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ५० फिरत्या दवाखान्यांची (मोबाइल व्हॅन) व्यवस्था करण्यात येणार आहे.

मालाडसह ४ परिसरांचा आयुक्तांनी घेतला आढावा
SHARES
कांदिवली, मालाड, बोरीवली, दहिसर या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने आपलं संपूर्ण लक्ष आता या विभागांकडे केंद्रीत केलं आहे. रहिवाशांच्या घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे. या भागातील रहिवाशांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावंच लागेल, तोंडाला मास्क लावावाच लागेल, अन्यथा कोरोनाचा संसर्ग वाढतच जाईल, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे. सोमवारी पालिका आयुक्त चहल यांंनी मालाडच्या आप्पापाडा परिसराला भेट देत परिसराचा आढावा घेतला.

मागील अनेक दिवसांपासून या तीन ही परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे लक्षात आल्यानंतर पालिकेने या तीन ही विभागांकडे लक्ष केंद्रीत केले. माञ लक्ष केंद्रीत करताना, उत्तर मुंबईत संपूर्ण टाळेबंदी न करता, केवळ ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्या ठिकाणी व लगतच्या परिसरांपुरतीच टाळेबंदी लागू  महापालिका प्रशासनाने केली. शिवाय मुंबई महापालिकेने या भागांसाठी खास मोहीम सुरू केली आहे. यामध्ये या घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी आढळल्यास घरातच ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरमार्फत ऑक्सिजन दिला जाणार आहे. त्यानंतरही आवश्यकता भासल्यास रुग्णाला कोरोना  काळजी केंद्रात नेलं जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.  

सद्यस्थितीत मालाड ते दहिसर या विभागात ११५ प्रतिबंधित क्षेत्र आणि ९०८ इमारतींमध्ये आवश्यकतेनुसार प्रतिबंध लागू करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीचा वेग कांदिवलीत २५ दिवस, मालाडमध्ये १९ दिवस, बोरीवलीत १८ दिवस आणि दहिसरमध्ये १५ दिवस असा आहे. मालाडमध्ये आतापर्यंत ३६१५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कांदिवलीत २१९७ कोरोनाबाधित रुग्ण, बोरिवलीत १९६१, तर दहिसरमध्ये आतापर्यंत १३४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 

मालाडमधील दिंडोशी, संतोषनगर, कुरार गाव, आप्पापाडा, कोकणी पाडा तर मालाड पश्चिमेकडील सोमवार बाजार, मढ विभागात तसंच तानाजी नगर, शिवाजी नगर, क्रांति नगर, डिंडोशी, पिंपरी पाडा, संतोष नगर या प्रतिबंधित क्षेत्रात पोलिसांच्या सहाय्याने नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. बहुतेक ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाची तैनाती करण्यात आली आहे. सोमवारी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चहल यांनी या परिसराला भेट दिली. या भेटीत चहल यांनी परिसरातील शौचालयातील स्वच्छता, नागरिकांना मिळाणारे औषध उपचार याचा आढावा घेतला.


या ठिकाणी कोरोनाचाा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेने आता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेने आता नवीन अ‍ॅक्शन प्लॅन हाती घेतला आहे. ‘मिशन झिरो’ ही संकल्पना पालिका राबवणार आहे. अंधेरीच्या शहाजीराजे भोसले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पालिकेने मिशन झिरो लाँच केला आहे. मुंबईतील सहा विभागांमध्ये मिशन झिरो राबवण्यात येणार आहे. यानुसार दोन ते तीन आठवड्यात रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ५० फिरत्या दवाखान्यांची (मोबाइल व्हॅन) व्यवस्था करण्यात येणार आहे. भांडुप , मुलुंड, बोरिवली, दहिसर, मालाड, कांदिवली या भागांचा मिशन झिरोमध्ये समावेश असल्याची माहिती पालिका आयुक्त चहल यांनी या वेळी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा