Advertisement

मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसरमध्ये घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी

कांदिवली, मालाड, बोरिवली, दहिसरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने या भागांसाठी खास मोहीम सुरू केली आहे.

मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसरमध्ये घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी
SHARES

कांदिवली, मालाड, बोरिवली, दहिसरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. हा भाग आता कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने या भागांसाठी खास मोहीम सुरू केली आहे. यामध्ये या घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी आढळल्यास घरातच ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरमार्फत ऑक्सिजन दिला जाणार आहे. त्यानंतरही आवश्यकता भासल्यास रुग्णाला कोरोना  काळजी केंद्रात नेले जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

शनिवारपर्यंत कांदिवलीत २०९०, मालाडमध्ये ३,३७८, बोरिवलीमध्ये १,८२५ आणि दहिसरमधील रुग्णांचा आकडा १,२७४ वर पोहोचला आहे. या चार विभागांत रुग्णदुपटीचा कालावधी १५ ते २० दिवस आहे. यात दहिसरचा सर्वाधिक म्हणजे १५ दिवस आहे. 

या ठिकाणी घरोघरी जाऊन तपासणी, स्थानिक दवाखान्यांच्या माध्यमातून आढळलेल्या रुग्णांशी संपर्क ठेवणे, स्वत:हून रुग्णांना फोन करून लक्ष ठेवणे अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत.  रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासल्यास कॉन्सनट्रेटर मशिनच्या माध्यमातून ऑक्सिजन दिला जाईल. यामुळे किमान दोन तास रुग्णाला आराम पडेल. यानंतर गरज भासल्यास रुग्णाला कोरोना काळजी केंद्रात नेले जाणार आहे. 

मालाड ते दहिसर या विभागांत ११५ कंटेन्मेंट झोन आणि ९०८ इमारतींमध्ये आवश्यकतेनुसार प्रतिबंध लागू करण्यात आला आहे. त्यानंतरही काही भागात रहिवाशांनी गर्दी करण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे येथील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. रहिवाशांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, खबरदारी घ्यावी आणि गरज भासल्यास संपर्क करावा, असं आवाहन पालिकेनं केलं आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईतील 'इतक्या' इमारती पुन्हा पुर्वरत

कोरोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील सर्वाधिक रुग्ण




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा