त्याच्यासाठी प्रायव्हसीच महत्वाची, पोलिसाच्या लगावली कानाखाली

सतत वर्दळीत वावरणाऱ्या मुंबईकरांना आपली प्रायव्हसी देखील तितकीच महत्वाची आहे. या प्रायव्हसीत आडकाठी आणण्याचा कुणी प्रयत्न केला तर मुंबईकरांना ते अजिबात सहन होत नाही. याच ताजं उदाहरण नुकतंच अंबोली येथे दिसून आलं.  पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी दार ठोठवणाऱ्या पोलिसाच्या एका गृहस्थाने चक्क कानशिलात लगावली. या प्रकरणी त्याला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचाः- क्लस्टर उद्घाटनाचे निमंत्रण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना नाही

 अंबोली पोलिस ठाण्यात अण्णासाहेब दराडे (५४) हे पासपोर्ट व्हेरिफिकेशनचे काम पाहतात. पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन ते तेथे राहतात का, तसंच त्यांच्या अन्य कागदपत्रांची पडताळणी करतात. ३० जानेवारी रोजी दराडे हे नेहमीप्रमाणे पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी परिसरात अर्ज केलेल्या नागरिकांच्या घरी भेटी देऊन वस्तूस्थिती पडताळत होते. दुपारी दीडच्या सुमारास दराडे जोगेश्वरीच्या केव्हीनपाडा परिसरातील एका सोसायटीत गेले. त्या सोसायटीत सतीश डांगे (३१) यांच्या चौकशीसाठी दराडे त्यांच्या दारात गेले. मात्र, दोन ते तीन वेळा दार ठोकूनही डांगे यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, दरवाजा ठोकावण्याच्या आवाजाने शेजारी राहणाऱ्या महिलेने दरवाजा उघडला. दराडे यांनी डांगे यांच्याबाबत त्या महिलेकडे चौकशी केली. दराडे यांनी आपण पोलिस असल्याची ओळख महिलेला सांगितली. त्यावेळी महिलेने दराडे यांच्यावर आवाज चढवतं, ‘इथे कुणी डांगे रहात नाही, आम्ही त्यांना नाही ओळखत’, असे सांगितले.

हेही वाचाः- पती-पत्नीच्या नावे घराची नोंदणी करणाऱ्यांना करामधून सूट द्या- शितल म्हात्रे

त्याचवेळी त्या ठिकाणी इस्माइल तारीख हा देखील आला. दराडे यांनी काही स्पष्टीकरण देण्याआधीच इस्माइलने त्यांच्या कानशीलात लगावली. दुपारच्यावेळी कशाला लोकांच्या घरात डोकावता असा प्रश्न करत त्याने दराडे यांना इमारतीतून हाकलून लावले. या प्रकरणी दराडे यांनी अंबोली पोलिस ठाण्यात ३५३,५०४,५०६ भा.द.वी. अंतर्गत गुन्हा नोंदवला. या प्रकरणी पोलिसांनी इस्माइलला अटक केली आहे. 

   

पुढील बातमी
इतर बातम्या