डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास भाग पाडणाऱ्यांवर होणार कारवाई

मुंबईत कोराना या संसर्ग रोगाशी डाॅक्टर, नर्स, आरोग्य विभागाचे अधिकारी, पालिका कर्मचारी आणि पोलिस दोन हात करत असताना. कोरोना रुग्णांच्या सर्वात जवळ राहणाऱ्या डाॅक्टर, नर्स, आरोग्य विभागाचे अधिकारी, पालिका कर्मचारी यांच्यामुळे आपल्याला हा रोग होऊ शकतो. या भितीने घरमालक त्यांना घराबाहेर काढत असल्याचे पुढे येत आहे. मानवतेच्या दृष्टीने तर हे अत्यंत चुकीचे आहेच परंतु नियमबाह्यही आहे. असे केल्यास संबधित घरमालक आणि गृहनिर्माण सोसायटीवरसाथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे शासनाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 

हेही वाचाः- अन्न व औषध प्रशासन विभागकडून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना

 सध्या करोना विषाणु साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे करताना त्यांना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी त्यांच्यामार्फत तसेच प्रशासनामार्फत घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाही. असे असतानाही काही घरमालक, हाऊसिंग सोसायट्या त्यांच्याकडे भाड्याने राहणारे डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना घर खाली करण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे पूर्णतः चुकीचे असून संबंधीत घरमालक, हाऊसिंग सोसायट्या यांनी असे करु नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचाः- लोकांना देणार धान्याऐवजी थेट पीठ, महसूलमंत्र्यांची माहिती

 एखादे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटी असे करत असल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. भाड्याच्या घरात राहणारे डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना असा अनुभव आल्यास त्यांनी आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जनतेच्या शंकांचं निरसन करण्यासाठी एक व्हॉटस्अॅप चॅट बॉटची घोषणा केली. तो नंबर आहे +९१२०६२२७३९४ तर पोलिस हेल्पलाईन नंबर आहे १००, १०८

पुढील बातमी
इतर बातम्या