अक्षय कुमारचा माॅर्फ व्हिडिओ यु ट्यूबवर; सायबर पोलिसांत तक्रार

यु ट्यूबवरील वादग्रस्त व्हिडिओमुळे अभिनेेता अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, हा व्हिडिओ कट पेस्ट करून चुकीच्या पद्धतीने यु ट्यूबवर टाकला असल्याचं अक्षय कुमारचं म्हणणं अाहे. हे. याप्रकरणी अक्षयने सायबर पोलिसात तक्रार नोंदवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तनुश्री दत्ताबाबत प्रश्न 

अभिनेता अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त पत्रकारांशी चर्चा केली होती. त्यावेळी एका पत्रकाराने अभिनेत्री करीना कपूरसोबत येणाऱ्या चित्रपटाविषयी प्रश्न विचारला. यावेळी अक्षयने त्या चित्रपटाबद्दल उत्तर देण्याची ही योग्य वेळ नसून त्याबाबत बोलण्यास नकार दिला. नेमका याच व्हिडिओतला हा प्रसंग समाजकंटकांनी तनुश्री दत्ताच्या प्रकरणाशी जोडला. विचारण्यात आलेला प्रश्न कट करून त्या जागी तनुश्री दत्ता प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर अक्षयने उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही समाजकंटकांनी व्हायरल केला.  

 

उपद्रवी व्यक्तींकडून व्हिडिओ

काही तासातच हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, त्यावर टीका होऊ लागल्या. ही बाब अक्षय कुमारच्या निदर्शनास आल्यानंंतर तो व्हिडिओ कट-पेस्ट करून चुकीच्या पद्धतीने चालवण्यात आल्याचं त्याने सांगितलं. अक्षयने स्वीय सहाय्यकाला या प्रकरणी सायबर पोलिस तक्रार करण्यासाठी पाठवलं.  उपद्रवी व्यक्तींकडून हा व्हिडिओ चालवण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अक्षयकडून देण्यात आलेल्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी तो व्हिडिओ शोधण्यास सुरूवात केला आहे.

अाधीही आक्षेपार्ह

सोशल मीडियावर अशा प्रकार आक्षेपार्ह व्हिडिओचा बळी पडणारा अक्षय हा पहिला अभिनेता नाही. या पूर्वी अनेक अभिनेत्यांना अशा व्हायरल आणि माॅर्फ व्हिडिओ किंवा सोशल मीडियावर बनावट खातं उघडण्यात आल्याचा अनुभव आला होता. अशा प्रकरणी अभिनेता सलमान खान, कंगणा रनाैत, अवधूत गुप्ते, आदीनाथ कोठारे, शशांक केतकर अादींना पोलिसात धाव घेण्याची वेळ आली होती.  या प्रकरणात सायबर पोलिस आता अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा -

दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपींना १२ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

१६ लाखांच्या एमडीसह ३ नायझेरियनला अटक


पुढील बातमी
इतर बातम्या