दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपींना १२ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी


दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपींना १२ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
SHARES

अनिसचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंंकेश यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आमोल काळेसह त्याच्या २ साथीदारांना न्यायालयाने १२ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


पोलिसांचं अटकसत्र

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अमोल काळेचं नाव पुढे आल्यानंतर त्याच्या चौकशीतून पुण्यात होणाऱ्या सनबर्न म्युझिकल काॅन्सर्टमध्ये स्फोट घडवण्यासाठी नालासोपारा इथं शस्त्रसाठा लपवण्यात आल्याचं उघडकीस आलं होतं. यानंतर एटीएसच्या पोलिसांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या कटात सहभागी असणाऱ्यांना ताब्यात घेत, सहभाग निश्चित होताच अटक करण्यास सुरूवात केली. या सर्वांमागे अमोल काळेचा सहभाग कालांतराने निश्चित झाला.


पोलिस कोठडीची मागणी

या सर्व आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि सापडलेल्या कागदपत्रांमुळे काही गोष्टी अद्याप अस्पष्ट आहेत. त्यामुळे या सर्व आरोपींची माहिती घेण्यासाठी सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करणं गरजेचं असल्याचं कारण न्यायालयात सादर करत एटीएसने अमोलसह त्याचे २ साथीदार अमित बद्दी आणि गणेश मिस्त्री यांच्या कोठडीची मागणी केली.

त्यानुसार न्यायालयाने १२ ऑक्‍टोबरपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे. नालासोपारा येथील स्फोटकांच्या प्रकरणात एटीएसने आतापर्यंत वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकरसह एकूण १२ आरोपींना अटक केली आहे.हेही वाचा-

गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपींचा 'या' स्फोटक प्रकरणात सहभाग

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण: 'हे' होते मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवरRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा