नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण: 'हे' होते मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर


नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण: 'हे' होते मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर
SHARES

नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी शुक्रवारी आणखी एक धक्कादायक माहिती महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथका (एटीएस)ने मुंबई सत्र न्यायालयात दिली. 'एसटीएस'च्या माहितीनुसार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव, डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर, राष्ट्रवादीचे काँग्रेस जितेंद्र आव्हाड आणि रितू राज हे मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर होते. 'एसटीएस'च्या या माहितीमुळं राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.


चौकशीतून पुढे

'एसटीएस'ने काही दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. या प्रकरणात 'एसटीएस'ने वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर यांना विविध ठिकाणांहून अटक केली. अटक करण्यात आलेल्या ५ जणांपैकी एकाचा संबंध डाॅ. दाभोलकर यांच्या हत्येशी असल्याचं समोर आलं.


पोलिस कोठडीची मागणी

या ५ जणांच्या चौकशीतून अविनाश पवार याचं नाव समोर आल्यावर 'एसटीएस'ने अविनाश पवारलाही ताब्यात घेतलं. अविशान पवारला शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी 'एसटीएस'ने पवारच्या चौकशीसाठी त्याची कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी केली.


न्यायालयाची विचारणा

या मागणीनंतर न्यायालयाने चौकशीत आतापर्यंत काय समोर आलं? याची माहिती एसटीएसकडे मागितली. त्यावेळी 'एसटीएस'च्या वकिलांनी आव्हाड, मुक्ता दाभोळकर, रितू राज आणि श्याम मानव मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर होते, असं न्यायालयात सांगितलं.



हेही वाचा-

शरद कळसकरचा ताबा सीबीआयला नाही!

'सुदर्शन चक्रा'नेच केली पानसरे, गौरी लंकेशची हत्या!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा