शरद कळसकरचा ताबा सीबीआयला नाही!

शरद कळसकर याच्या चौकशीतून अनेक खुलासे झाले. कळसकर याचा डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत सहभाग असल्याचंही यातूनच पुढं आलं. त्यातून एटीएसच्या तपासाची चक्रे वेगाने फिरायला लागली.

शरद कळसकरचा ताबा सीबीआयला नाही!
SHARES

मुंबईतील नालासोपारा इथून ताब्यात घेतलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर ताबा मिळवण्यास पुन्हा एकदा सीबीआयला अपयश आलं. चौकशीसाठी कळसकरचा ताबा मिळावा, असा अर्ज सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात केला होता. परंतु हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा इथून वैभव राऊत याच्यासह इतर ठिकाणांहून सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर यांना अटक केली आहे. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात देशी बाॅम्ब, पिस्तुल, काडतूस आणि शस्त्र बनवण्याची पुस्तकं जप्त करण्यात आली.


चौकशीतून खुलासे

शरद कळसकर याच्या चौकशीतून अनेक खुलासे झाले. कळसकर याचा डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत सहभाग असल्याचंही यातूनच पुढं आलं. त्यातून एटीएसच्या तपासाची चक्रे वेगाने फिरायला लागली.


सीबीआयची मागणी

सीबीआयने न्यायालयात दावा केला आहे की सचिन अंदुरेनेच डाॅ. दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद कळसकर यानेही दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची कबुली एटीएसला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सचिन आणि शरद या दोघांनाही समोरासमोर बसवून चौकशी करण्याची मागणी सीबीआयने न्यायालयाला केली होती.



हेही वाचा-

दाभोलकर, लंकेश यांची हत्या एकाच पिस्तुलातून! सीबीआयचा दावा

'सुदर्शन चक्रा'नेच केली पानसरे, गौरी लंकेशची हत्या!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा