सचिन अंदुरेच्या भावाच्या घरीही शस्त्रे सापडली


सचिन अंदुरेच्या भावाच्या घरीही शस्त्रे सापडली
SHARES

डाॅ. नरेद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने औरंगाबादहून एटीएस अधिकाऱ्यांच्या मदतीने सचिन अंदुरे या दुसऱ्या आरोपीला अटक केली. सचिनच्या अटकेनंतर सोमवारी मित्राच्या आणि त्याच्या भावाच्या घराची सीबीआयने झडती घेतली. यावेळी दोघांच्याही घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यामध्ये ७.६५ बोअरवेलचं पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे, तलवार आणि एका कट्यार अाहे.


सचिनच डाॅ. दाभोलकरांचा मारेकरी 

नालासोपारा येथील स्फोटकाचा तपास करतना आरोपी शरद कळसकर याच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव पुढे आलं. त्यानुसार एटीएसच्या अधिकाऱ्यांनी १९ आॅगस्टला सचिनला अटक केली. चौकशीत सचिनच डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांचा मारेकरी असल्याचं निश्चित झालं. सचिन हा पत्नी आणि मुलीसह औरंगाबादच्या राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याने राहतो. जवळीलच निराला बाजारात तो कपड्याच्या दुकानात कामाला होता.


भाऊ आणि मित्र ताब्यात 

सचिनचे जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे सापडलेल्या बंदुकीनेच डाॅ.नरेंद्र दाभोलकर, काॅ. गोविंद पानसरे, प्रा.एमएम कलबुर्गी आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली असण्याची शक्यता वर्तवली आहे. या प्रकरणी सीबीआयने सचिनचा भाऊ आणि मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


२६ जण होते हिटलिस्टवर 

काॅ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अमोल काळे याला अटक केली अाहे. त्याच्याजवळ मिळालेल्या डायरीत हिंदू संघटनांना विरोध करणाऱ्या २६ जणांची नावे लिहिली अाहेत. त्यामध्ये ठाण्यातील ६ तर मुंबईतील एसपी नावाच्या व्यक्तीचं नाव अाहे. 



हेही वाचा -

हिंदू संघटनांनी टाकलं दहशतवाद्यांच्या पावलांवर पाऊल

माजी सिडको संचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

शस्त्रसाठ्यासाठी श्रीकांत पांगारकरनेच केली आर्थिक मदत!




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा