माजी सिडको संचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

माजी सिडको संचालक नामदेव भगत विरोधात उरण पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशाची मदत करतो, असं सांगत भगत यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप एका १९ वर्षीय तरुणीने केला आहे. ९ ऑगस्ट ते १९ ऑगस्टदरम्यान भगत यांनी केलेल्या सर्व संभाषाणाची माहिती पीडितेनं तक्रारीत नमूद केली असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

माजी सिडको संचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा
SHARES

शिवसेना नगरसेवक आणि माजी सिडको संचालक नामदेव भगत विरोधात उरण पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशाची मदत करतो, असं सांगत भगत यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप एका १९ वर्षीय तरुणीने केला आहे. ९ ऑगस्ट ते १९ ऑगस्टदरम्यान भगत यांनी केलेल्या सर्व संभाषाणाची माहिती पीडितेनं तक्रारीत नमूद केली असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


संपूर्ण प्रकार

नेरुळ परिसरातील रहिवासी असून तिचे वडील सुरक्षारक्षक म्हणून घराजवळील महापालिका शाळेत कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची बदली बेलापूर येथील पालिका मुख्यालयात झाली होती. ही बदली रद्द करावी म्हणून पीडित मुलगी स्थानिक नगरसेवक भगत याच्या घरी मदतीसाठी गेली होती. त्या ओळखीतून भगत याने आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं पीडितेने सांगितलं.

दरम्यानाच्या काळात आर्थिक नड भासल्याने पीडितेन भगत यांचाकडे 30 हजार रुपयांची मदत मागितली होती. त्यानुसार पैशांची मदत करतो, असं सांगूण भगत यांनी मुलीला फार्महाऊसवर बोलवून घेतलं. पीडित मुलगी भगतच्या फार्महाऊसवर गेली असता त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. भगत याला विरोध करताच, आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचं मुलीने तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा