हिंदू संघटनांनी टाकलं दहशतवाद्यांच्या पावलांवर पाऊल

दहशतवादी संघटना ज्याप्रकारे आत्मघाती कट रचून घातपात घडवतात, त्याच कूटनितीचा वापर करून या पाचही आरोपींना राज्यात स्फोट घडवायचं होतं, हे आता पोलिस तपासात निश्चित झालं आहे. त्यामुळेच जिहादी दहशतवाद्यांच्या पावलांवर पाऊल टाकत, असे माथेफिरू समाजात भगवा दहशतवाद फोफावू पाहत असल्याचं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

हिंदू संघटनांनी टाकलं दहशतवाद्यांच्या पावलांवर पाऊल
SHARES

महाराष्ट्रातल्या चार महत्त्वाच्या शहरांमध्ये घातपाताचा कट दहशतवादविरोधी पक्षाने उधळून लावत आतापर्यंच पाच जणांना अटक केली. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ज्या पद्धतीने दहशतवादी आत्मघाती कट रचून घातपात घडवतात, त्याच कूटनितीचा वापर करून या पाचही आरोपींना राज्यात स्फोट घडवायचं होतं, हे आता पोलिस तपासात निश्चित झालं आहे. त्यामुळेच जिहादी दहशतवाद्यांच्या पावलांवर पाऊल टाकत, असे माथेफिरू समाजात भगवा दहशतवाद फोफावू पाहत असल्याचं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.


यांच्या मारेकऱ्यांचाही शोध लागला

नालासोपारा येथील वैभव राऊतच्या घरात मोठ्या प्रमाणात देशी शस्त्रसाठा मिळून आल्यानंतर राज्यभरात अटकेची कारवाई सुरू झाली. एटीएसने एक-एक करून या प्रकरणात पुढे चार आरोपींना अटक केली. योगायोग म्हणजे मागील पाच वर्षांपासून शोध घेत असलेल्या डॉ . दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचाही शोध याच कारवाईत लागला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली.


सोशल मीडियापासून दूर

ज्याप्रमाणे दहशतवादी कुणी आपला माग काढू नये, यासाठी स्वत:ला इतरांपासून आणि विशेषता सोशल मिडियापासून दूर ठेवतात. त्याच पद्धतीचा वापर या पाच जणांनी केला. या पाचही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या सोशल मिडियावरील हालचाली पाहिल्या असता. फार कमी वेळ त्यांनी सोशल मिडियाचा वापर केला आहे. ज्याप्रमाणे दहशतवादी घरातल्या घातक वस्तूंपासून स्फोटक बनवतात. त्याच पद्धतीने या पाचही आरोपींनी घरातील वस्तूंपासून हे देशी बॉम्ब बनवल्याचं पुढे आलं आहे. हे देशी बॉम्ब बनवण्यासाठी या आरोपींनी दहशतवाद्यांनी इंटरनेटवर अपलोड केलेल्या पुस्तकाचा वापर केल्याचं कळतं.


असा रचला कट

दहशतवाद्यांनी इंटरनेटवर अपलोड केलेल्या पुस्तकात कट कसा रचावा? जातीच्या नावाखाली संघटना कशी उभी करावी? धर्मांच्या नावाखाली भांडवल कसं उभं करावं? ही सर्व माहिती दिलेली असते. अगदी त्यापद्धतीने या पाच जणांनी हा कट रचल्याचं कळतं.

या आरोपींना पकडल्यानंतर पोलिसांना कशा प्रकारे कायद्याच्या अडचणी येत असतात, त्याचं संपूर्ण प्रशिक्षण देऊन पोलिसांचा तपास भरकटवण्याचंही मार्गदर्शन केलं जातं. या सर्व पद्धती आतापर्यंत दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईतून पुढे आलं आहे. मात्र नुकत्याच राज्यात घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींच्या चौकशीतूनही या बाबी दिसून आल्यानं राज्यात दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या हिंदू संघटनांनीही दहशतवाद्यांच्या पावलावर पाऊल टाकल्याचं आतापर्यंतच्या कारवाईतून दिसून आलं आहे.


हेही वाचा - 

दाभोलकर हत्या प्रकरण: पांगरकरला २८ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी

शस्त्रसाठ्यासाठी श्रीकांत पांगारकरनेच केली आर्थिक मदत!

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा