दाभोलकर हत्या प्रकरण: पांगरकरला २८ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी

डाॅ दाभोलकर हत्येप्रकरणात सचिनचा सहभाग निश्चित झाला असला तरी श्रीकांतचा सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही. श्रीकांतला फक्त घातपाती कारवाई करण्याच्या प्रयत्नात शस्त्रास्त्र जमा करणे या गुन्ह्यात एटीएसने जालन्यातून अटक केली आहे.

दाभोलकर हत्या प्रकरण: पांगरकरला २८ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी
SHARES

राज्यात घातपाती घडण्याच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या श्रीकांत पांगरकरला न्यायालयाने २८ आॅगस्टपर्यंत पोलिस (एटीएस) कोठडी सुनावली आहे. श्रीकांतच्या चौकशीत त्याने या कटात सहभागी होण्यासाठी २ वर्षांपासून स्वत: ला सोशल मीडियापासून दूर ठेवल्याचं चौकशीत पुढं आलं आहे.



चौकशीतून कनेक्शन उघड

घातपाती कारवाई करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्या चौकशीतून डाॅ. दाभोलकर यांच्या हत्येचा उलघडा झाला. डाॅ दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी केलेल्या चौकशीत शरद कळसकरने औरंगाबादचा रहिवासी सचिन अंधुरेचं नाव घेतलं. त्याचबरोबर शरद आपण कायम श्रीकांत यांच्या संपर्कात असल्याची कबुली दिली. त्यानुसार एटीएसने सूत्र हालवली.


कशी झाली अटक?

त्याआधारे पोलिसांनी एका रात्रीत सचिन आणि श्रीकांत यांना अटक केली. डाॅ दाभोलकर हत्येप्रकरणात सचिनचा सहभाग निश्चित झाला असला तरी श्रीकांतचा सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही. श्रीकांतला फक्त घातपाती कारवाई करण्याच्या प्रयत्नात शस्त्रास्त्र जमा करणे या गुन्ह्यात एटीएसने जालन्यातून अटक केली आहे.


कोण आहे श्रीकांत?

श्रीकांत हा हिंदू जनजागृती समितीत सल्लागार म्हणून काम पहायचा. त्याच्या फेसबुक पेजवरही तशा प्रकारच्या पोस्ट आहेत. या पोस्ट २०१५ आणि २०१४ सालच्या आहेत.

एटीएस पोलिसांनी श्रीकांतला सोमवारी सकाळी विशेष न्यायालयात हजर केलं असता. न्यायालयाने त्याला २८ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्याने दिली.



हेही वाचा-

राज्यात घातपात घडवण्याच्या प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक

डाॅ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा