डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक


डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक
SHARES

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सीबीआय) शनिवारी औरंगाबादहून सचिन अंधुरेला अटक केली. यापूर्वी या गुन्ह्यात मुंबईतून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला सीबीआयनं अटक केली अाहे. तीन वर्षांपूर्वीच्या या हत्याकांडावरून झालेली ही दुसरी अटक असून या प्रकरणाच्या संथगती तपासाबद्दल न्यायालय तसेच माध्यमांमधून यंत्रणेवर जोरदार टीका होत होती. महाराष्ट एटीएसनं वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कासळकरच्या चौकशीतून सचिनचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे.



पाच वर्षांपूर्वी झाली हत्या

डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ साली पुण्यात दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. या हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आल्यानंतर ९ मे २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सीबीआय’नं गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचा आरोप होत होता. २०१४ साली गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर अटक झालेल्या ‘सनातन’च्याच समीर गायकवाड या साधकाच्या चौकशीतूनही दाभोलकर हत्येविषयी काही धागेदोरे मिळतात का, याची छाननी सुरू होती. मात्र त्यापुढे तपास पुढे जात नव्हता.


असा झाला सहभाग उघड

दरम्यान राज्यात घातपाताच्या तयारीत असलेल्या वैभव राऊत, शरद कासळकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांचा एटीएसनं नुकताच पर्दाफाश केला. या तिघांच्या घरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. यातील सुधन्वाचा सहभाग पोलिसांना संशयास्पद वाटत होता. एटीएसनं केलेल्या कारवाईत सुधन्वाच्या घरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळाला होता. त्याचबरोबर शरदच्या घरातून विविध नंबरप्लेट आणि सिमकार्डही पोलिसांना सापडले होते. याबाबत एटीएसनं शरदकडे डाॅ. दाभोळकर हत्येप्रकरणी चौकशी केली असता, त्याने औरंगाबाद येथील सहकरी सचिन अंधुरे सहभागी असल्याची कबुली पोलिसांना दिली.


अनेक धागेदोरे उलगडणार

या हत्येत दोघांनी दुचाकीचा वापर केल्याचे सांगण्यात अाले. एटीएसने सीबीआयला सचिनच्या सहभागाची माहिती दिली. त्यानुसार सीबीआयने सचिनला शनिवारी अटक केली आहे. दरम्यान वैभव, शरद आणि सुधन्वा यांची कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या चौकशीत काॅ. पानसरे यांच्या हत्येतील आरोपीचाही सहभाग निश्चित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा -

वैभव राऊतने उघडला होता घातक शस्त्रांचा कारखाना

नालासोपाऱ्यासह, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये होता घातपाताचा डाव!



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा