नालासोपाऱ्यासह, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये होता घातपाताचा डाव!

गुरूवारी एटीएसने केलेल्या कारवाईत पोलिसांना २० देशी बाॅम्ब आढळून आले. त्यापैकी ८ देशी बाॅम्ब वैभवच्या घरातून तर, १२ देशी बाॅम्ब दुकानातून हस्तगत करण्यात आले. एवढंच नव्हे, तर ५० बाॅम्ब तयार होतील एवढं साहित्यही त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलं. तर शरदच्या घरातून बाॅम्ब कसे बनवायचे याचं रेखाचित्र असलेली कागदपत्रे सापडली. या प्रकरणी पोलिसांनी अन्य १५ ते १६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

नालासोपाऱ्यासह, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये होता घातपाताचा डाव!
SHARES

राज्यात देशी बाॅम्बच्या सहाय्याने घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना महाराष्ट्र एटीएसने गुरूवारी रात्री अटक केली. वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघेही नालासोपाऱ्यासह पुणे, सातारा आणि सोलापूरमध्ये घातपात घडवणार असल्याची धक्कादायक माहितीही पुढं आली आहे. या तिघांकडून २० देशी बाॅम्बसहित ५० देशी बाॅम्ब तयार करण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या तिघांपैकी दोघेजण हिंदू जनजागृती समितीशी तर एकजण शिवप्रतिष्ठान संस्थेशी संबंधित असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या तिघांना एटीएसच्या विशेष न्यायालयाने १८ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


कसे आले जाळ्यात?

काही जण राज्यात घातपात करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती एटीएसला ७ आॅगस्ट रोजीच मिळाली होती. यापैकी ५ संशयीतांचे मोबाइल नंबर देखील पोलिसांच्या हाती आले होते. या मोबाइल नंबरचा माग काढत एटीएसचे अधिकारी नालासोपाऱ्यातील भांडारआळीतील वैभव राऊतपर्यंत जाऊन पोहोचले. वैभव राऊत सनातन संस्थेचा कथित साधक असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु सनातनने वैभव त्यांचा कार्यकर्ता नसल्याचं स्पष्ट केलं आहे. वैभवच्या चौकशीतूनच शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांची नावं पुढे आली.


काय साहित्य जप्त केलं?

गुरूवारी एटीएसने केलेल्या कारवाईत पोलिसांना २० देशी बाॅम्ब आढळून आले. त्यापैकी ८ देशी बाॅम्ब वैभवच्या घरातून तर, १२ देशी बाॅम्ब दुकानातून हस्तगत करण्यात आले. एवढंच नव्हे, तर ५० बाॅम्ब तयार होतील एवढं साहित्यही त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलं. तर शरदच्या घरातून बाॅम्ब कसे बनवायचे याचं रेखाचित्र असलेली कागदपत्रे सापडली. या प्रकरणी पोलिसांनी अन्य १५ ते १६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.


काय होतं प्लानिंग?

मागील आठवड्यापासूनच या तिघांनी घातक बाॅम्ब बनवण्यास सुरूवात केली होती. वस्तुस्थिती पाहता हे बाॅम्ब जास्त क्षमतेचे वाटत नाहीत, पण वापरण्यात आलेल्या वस्तू लक्षात घेता. या बाॅम्बच्या तीव्रतेचा अंदाज लावणं कठीण आहे. ५० बाॅम्ब बनवून ही टोळी नालासोपाऱ्यासह, पुणे, सातारा आणि सोलापूरमध्ये घातपात घडवणार होती. हे सर्व संशयित नवोदित असून यामागे नक्कीच दुसरा मास्टर माइंड असावा. या गुन्ह्यातील आरोपींची चौकशी गौरी लंकेश, पानसरे आणि दाभोळकर यांच्या हत्येच्या अनुषंगानेही केला जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली.


वैभवच्या घरातून जप्त केलेल्या वस्तू

  • घरातून ८ देशी बाॅम्ब
  • दुकानातून १२ देशी बाॅम्ब
  • २ जिलेटिनच्या कांड्या
  • ४ डेटोनेटर
  • सेफ्टीफ्यूज वायर
  • २२ नाॅन इलेक्ट्राॅनिक डेटोनेटर
  • पांढरी पावडर असलेली वर्तमानपत्रात गुंडाळलेली कांडी
  • २ लिटर विष
  • १ बाॅक्स बॅटरी (१ बाॅक्समध्ये १० बॅटरी)
  • १६ बोल्ट बॅटरी
  • १ कटर
  • १ एक्सोब्लेड
  • १ सोल्डरिंग मशीन
  • ३ स्विच
  • २ पीबीसी सर्किट
  • ६ बॅटरी कनेक्टर
  • ४ रिले स्विच
  • ८ रजिस्टाॅन्ली
  • ६ ट्रान्जेस्टर
  • वायरींचे तुकडे
  • हॅन्डग्लोज
  • चिटकवण्यासाठी लागणारे सोल्युशन
  • १ हँड ब्रांन्ड सक्रिट पेपर



हेही वाचा-

ब्राऊन शुगरच्या तस्करांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

घाटकोपर बॉम्ब स्फोटातील फरार आरोपीला १६ वर्षांनंतर अटक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा