ब्राऊन शुगरच्या तस्करांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लाखो रुपयांच्या ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या टोळीचा अंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राकेश गोवर्धनलाल हिरोइया उर्फ धोबी याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून 1 किलो 5 ग्रॅमचे ब्राऊन शुगर हस्तगत केलं आहे.

ब्राऊन शुगरच्या तस्करांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
SHARES

मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत लाखो रुपयांच्या ब्राऊन शुगरची तस्करी करण्यासाठी आलेल्या टोळीचा अंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राकेश गोवर्धनलाल हिरोइया उर्फ धोबी याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून 1 किलो 5 ग्रॅमचे ब्राऊन शुगर हस्तगत केलं आहे.


तस्करांना पकडण्यासाठी रचला सापळा

भांडुपमध्ये एएनसीने केलेल्या धडक कारवाईनंतर आयुक्तांनी मुंबईतल्या सर्व परिमंडळांना अंमली पदार्थांच्या तस्करांविरोधात धडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार अंबोली पोलिसांना वि. रा. देसाई रोड परिसरात लाखो रुपयांच्या तस्करीसाठी एक जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसर पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली.


30 लाख रुपयांची ब्राऊन शुगर जप्त

वि. रा देसाई रोड परिसरात राजेश संशयितरित्या फिरत असताना पोलिसांनी त्याला पकडलं. त्याची अंग झडती घेतली असता. पोलिसांना त्याच्याजवळ 1 किलो 5 ग्रॅमची ब्राऊन शुगर आढळून आली. बाजारात या ब्राऊन शुगरची किंमत 30 लाख रुपये आहे. दरम्यान चौकशीत अंधेरीच्या उच्च भ्रूवस्तीत ब्राऊन शुगकची तस्करी करण्यासाठी आल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.


हेही वाचा -

नालासोपाऱ्यात 8 देशी बॉम्ब जप्त, मुंबई एटीएसची कारवाई

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा